संपादकीय

रजनीकांत ते गांगुली व्हाया पश्चिम बंगाल

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या चार राज्यापैकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या सत्तेसाठी भाजप प्रचंड उत्सुक असून त्यासाठी सर्व क्लुत्या आणि फ़ंडे वापरण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. (Rajinikanth to Ganguly via West Bengal)

तामिळनाडू मध्ये सत्ताधारी आण्णा द्रमुक पक्षाला शह देण्यासाठी भाजपने तेथील जनतेच्या गळ्यातील ताईत आणि कॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांचा खांदा घेण्याचा प्रयत्न केला होता. रजनीकांत यांना राजकारणात आणून त्यांच्या नवीन पक्षाद्वारे आपले इस्पित साध्य करण्याची इच्छा भाजपचो होती. अण्णा द्रमुकचे जेवढे कमी आमदार निवडून येतील तेवढे युती मध्ये असूनही आपली बार्गेनिग पॉवर वाढेल असा कयास होता. बिहार फॉर्म्युला प्रमाणे रजनीकांत यांच्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून एआयडीएमके चे शिलेदार टिपण्याची तयारी होती. पण अचानक रजनीकांत यांना उच्च रक्तदाब त्रास सुरू झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयातून घरी आल्यानंतर रजनीकांत यांनी देवाचा कौल म्हणून आपण राजकारणात येणार नसल्याचे जाहीर करून भाजपच्या मन्सूब्यावर पाणी फिरवले. एका अर्थाने रजनीकांत यांनी चक्रव्यूहातुन स्वत:ची सुटका करून घेतल्याचे मानले जाते.

अगदी याच वेळी पश्चिम बंगाल मध्येही अशीच एक स्क्रिप्ट लिहिली जात आहे. कोणत्याही स्थितीत ममता दीदी यांना सत्तेबाहेर काढायचेच म्हणून दस्तुरखुद्द गृहमंत्री अमित शाह इरेला पेटले आहेत. तृणमूलची शक्ती आणि त्यांची बलस्थाने कमजोर करण्यासाठी दिगग्ज नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे. तर ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांना हाताशी धरून साम, दाम, दंड, भेद या नीतीने राजकारण करण्यात येत आहे. याच बंगाल मधील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली. हाच चेहरा निवडणुकीत मते खेचू शकतो हे पाहून तशा हालचाली सुरू झाल्या. अमित शाह यांच्या दोन ते तीन कार्यक्रमात गांगुली यांची उपस्थिती बरेचसे काही सांगून जाणारे ठरले.

या संशयाला बळकटी देण्याचे काम गांगुली यांच्या राज्यपाल भेटीने केले. पण अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातुन बरे होऊन बाहेर आल्यावर गांगुली सुद्धा रजनीकांत यांचीच रि ओढणार की राजकारणाच्या जाळ्यात अडकून आपली विकेट काढून घेणार, हे लवकरच समजेल.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

1 hour ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

5 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

6 hours ago