एज्युकेशन

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी; तर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियु्क्ती

मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदांची घोषणा आज कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रविंद्र कुलकर्णी तर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय घनश्याम भावे यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

हे सुद्धा वाचा

देशात मुस्लिम, ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र – शरद पवार 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध का होता ?

बाल शिवाजीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला,आकाश ठोसर मुख्य भूमिकेत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आला होता. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली नव्हती. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने देखील मविआ सरकारच्या विद्यापीठ कायद्याला विरोध केला होता. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र या सरकारने मविआ सरकारने केलेले कायद्यातील बदल रद्द केले. या सर्व घडामोडीमध्ये कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रीया रखडली होती. दरम्यान आज कुलपती बैस यांनी कुलगुरुपदांच्या नावांची घोषणा केली आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago