32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeव्हिडीओछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध का होता ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध का होता ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांनी खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले होते. औरंगजेब, आदिलशाह, निजाम, पोर्तूगीज व काही अंशी ब्रिटीश अशा चोहो बाजूंनी असलेल्या शत्रूंचे शिवाजी महाराजांनी नामोहरण केले होते.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची चर्चा दाही दिशा होऊ लागली होती. परंतु शिवाजी महाराजांचा ‘राजा’ म्हणून कोणताही विधी झालेला नव्हता. मॉं जिजाऊ यांच्या आशिवार्दाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील तमाम अठरापगड जातीच्या मराठी समाजासाठी ही स्वाभिमानाची बाब होती.

 

असे असले तरी उच्चवर्णीय असलेल्या ब्राह्मण समाजाला ही बाब आवडली नाही. कारण मनुस्मृती व इतर ग्रंथाप्रमाणे शिवाजी महाराज हे दुय्यम जातीत जन्माला आलेले होते. राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. महाभारत व रामायण हे हिंदू धर्माचे ग्रंथ मानले जातात. या ग्रंथात सुद्धा पांडव किंवा राम हे उच्चवर्णीय असल्याने नमूद केले आहे.
कर्णासारख्या शूर योद्ध्याला द्रौपदी स्वयंवरात सहभागी होऊ दिले नव्हते. कारण कर्ण उच्चवर्णीय नव्हता.  एकलव्य हा अर्जूनापेक्षाही शूर होता. परंतु तो क्षुद्र होता, म्हणून द्रोणाचार्यांनी गुरूभेट म्हणून त्याचा अंगठा कापून घेतला होता.

शिवाजी महाराज हे ब्राह्मण नव्हते. हिंदू समाजातील तथाकथीत परंपरेनुसार केवळ जातीमुळे शिवाजी महाराज राजा होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केल्याचे इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे महाराजांनी काशीवरून गागाभट्ट यांना राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते. गागाभट्ट यांनी सुद्धा राजतिलक लावताना हाताने लावण्याऐवजी पायाच्या अंगठ्याने लावला होता, असे या इतिहासकारांनी लिहिले आहे.
शिवाजी महाराजांएवढ्या कर्तृत्ववान राजाला सुद्धा जातीभेदाचा मोठा फटका बसला होता, त्याचे हे एक छोटे उदाहरण समजावे लागेल.

 

हे सुद्धा वाचा

बाल शिवाजीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला,आकाश ठोसर मुख्य भूमिकेत

संगमनेरमध्ये हिंदूंच्या मोर्चानंतर दोन गटात दगडफेक

आयफोन वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, ऍपल iOS 17 नव्या अपडेटसह येणार बाजारात !  

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी