मनोरंजन

Adipurush Movie : ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी, मनसेचा भाजपला टोला

एखादा सिनेमा वेगळा विषय घेऊन आला की त्यातील दृष्यांवरून तो हमखास टीकेच्या स्वाधीन होतो. या टीकांमुळे निर्मात्यांची चांगलेची भंबेरी उडते पण कालांतराने काही अटी- शर्तींनंतर माघार घेतल्यास वादळ शांत सुद्धा होतं. असंच काहीस पुन्हा घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ब्रम्हास्त्रानंतर आदिपुरुष या सिनेमाने केवळ टीझरवरूनच उत्सुकता निर्माण केली आहे परंतु असे असले तरीही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा भाजपकडून इशारा देण्यात आला आहे त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची चांगलीच गोची झाली आहे. याच सगळ्या गोंधळात मनसे मात्र या सिनेमाच्या बाजूने उभी राहिली असून भाजपच्या या एककलमी बाण्याला विरोध केला आहे.

मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पत्रक जारी केले असून त्यांनी आदिपुरुष या सिनेमाची पाठराखण केली आहे. यामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी असल्याचे म्हणत त्यांनी ओम राऊत यांचे कौतुक केले आहे. खोपकर यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी अमेय खोपकर म्हणाले, आदिपुरुष’ सिनेमाची टीम आणि ओम राऊतच्या मागे मनसे खंबीरपणे उभी आहे. ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ सारखे सिनेमे ओमने बनवले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस आहे. राज्यातल्या सिनेमा समजणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्यांना माझा प्रश्न आहे, 95 सेकंदच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही कसा बांधता? आधी सिनेमा पाहा असे म्हणून खोपकरांना भाजपला खडसावले आहे.

हे सुद्धा वाचा…

Aryan Khan : शाहरुख-गौरीचा मुलगा करणार मनोरंजन क्षेत्रात डेब्यू; आर्यनच्या खांद्यावर विशेष जबाबदारी

MS Dhoni : भारताला पुढचा धोनी मिळाला? अगदी ‘माही’सारखाच केलाय सामना फिनिश

INDvsSA ODI : आफ्रिकेच्या ताकदीपुढे गब्बरचा संघ फेल; 9 धावांनी गमावला पहिला सामना

अमेय खोपकर पुढे म्हणतात, एक 95 सेकेंडचा टीझर आऊट होतो आणि त्यानंतर टिका होते हे चुकीचं आहे. हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. पुढच्या पिढीला या सिनेमाच्या माध्यमातून पौराणिक गोष्टी कळतील. राम कदमांना सिनेमा कळत असेल तर त्यांनी सिनेमा बनवावा असे म्हणून खोपकरांनी थेट राम कदमांवर निशाणा साधला असून टीझरवरून टिकाटिप्पणी करणाऱ्या कदमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याबाबत अमेय खोपकर यांनी सोशलमीडियावर पोस्ट करून आपले म्हणणे सुद्धा मांडले आहे. ट्विटमध्ये अमेय लिहितात, ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरू आहे.

अमेय खोपकर पुढे लिहितात, ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’च्या निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे असे म्हणून खोपकरांनी या सिनेमासाठी मनसेचा पुर्ण पाठींबा असल्याचे सांगत उगाचच कोणत्या कारणावरून उहापोह करणाऱ्या भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

25 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

1 hour ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

17 hours ago