मनोरंजन

Aryan Khan : शाहरुख-गौरीचा मुलगा करणार मनोरंजन क्षेत्रात डेब्यू; आर्यनच्या खांद्यावर विशेष जबाबदारी

शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनाच्या जगात प्रवेश करत आहे. रिपोर्टनुसार, आर्यन खान लवकरच एका वेब सीरिजमध्ये अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणून पदार्पण करणार आहे. 24 वर्षीय आर्यनने वेब सीरिजची कथा लिहिण्याचे काम पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानच्या या मालिकेसाठी कलाकारांचा शोध घेतला जात आहे. तो ज्या वेबसिरीजवर काम करत आहे, त्या वेबसिरीजच्या लेखनाचे काम पूर्ण झाले आहे. कास्टिंगसाठी आर्यन स्वत: कलाकारांच्या प्रोफाइलची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

वर्षाच्या अखेरीस ही मालिका सुरू होईल
रिपोर्टमध्ये पुढे असंही लिहिलं आहे की, मालिकेसाठी फक्त अशाच कलाकारांची निवड केली जावी, जे व्यक्तिरेखेला बसतील. यामुळेच आर्यन लेखनानंतर मालिकेतील कलाकारांच्या निवडीकडे लक्ष देत आहे. या मालिकेसाठी अनेक कलाकारांनी ऑडिशन दिल्या आहेत. अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा सुरू असून काही कलाकारांना शॉर्टलिस्टही करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, या वेब सीरिजचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. शाहरुख खानने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, आर्यन खानला अभिनयात फारसा रस नाही. आर्यनला दिग्दर्शन आणि लेखनाची आवड आहे. आर्यन गेल्या चार वर्षांपासून फिल्ममेकर बनण्यासाठी मेहनत घेत आहे. लेखन आणि दिग्दर्शनाशी संबंधित बारकावे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत आहे.

हे सुद्धा वाचा

MS Dhoni : भारताला पुढचा धोनी मिळाला? अगदी ‘माही’सारखाच केलाय सामना फिनिश

INDvsSA ODI : आफ्रिकेच्या ताकदीपुढे गब्बरचा संघ फेल; 9 धावांनी गमावला पहिला सामना

Jobs Update : हवामान खात्यात काम करण्यास इच्छुक आहात? मराठी मुलांसाठी मोठी संधी

बिलाल यांनी एकत्र लेखन केले आहे
आर्यन खानच्या या वेब सिरीजचा विषय चित्रपट जगताशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत चित्रपटसृष्टीतील विविध गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मालिकेत बिलाल सिद्दीकी हा आर्यनसोबत लेखक म्हणूनही जोडला गेला आहे. बिलालने यापूर्वी नेटफ्लिक्स शो ‘बार्ड ऑफ ब्लड’साठी लेखन केले आहे. ‘जर्सी’ चित्रपटात दिसलेला अभिनेता प्रीत कमानी या वेब सीरिजचा भाग बनू शकतो, असे वृत्त आहे. सध्या सर्वांना आर्यन खानच्या या प्रोजेक्टची प्रतीक्षा आहे. लेखक म्हणून आर्यनचे टॅलेंट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान चर्चेत आला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. त्यानंतर काही दिवस आर्यनला जेलची हवा खायला लागली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांत तो तिथून बाहेर पडला. विशेष म्हणजे आर्यनला ड्रग्जचे सेवन करताना रंगेहात पकडले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. यावरूनवही मोठ्या काळासाठी आर्यन आणि शाहरुख चर्चचा विषय ठरले होते. मात्र आता हे सगळे मागे सोडत आर्यन त्याते करिअर पुन्हा उभारण्यासाठी पुन्हा सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago