मनोरंजन

मोहन भागवत यांनी केले ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे कौतुक

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत तो ‘स्वरगंधर्व सुधीर फडके'(Swargandharva Sudhir Phadke) चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच ‘बाबुजी’ हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. बाबुजी गायक, संगीतकार होतेच, परंतु ते एक सच्चे देशभक्तही होते. नुकताच हा चित्रपट सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रपटाच्या टीमसोबत पाहिला आणि या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. (Mohan Bhagwat praises ‘Swargandharva Sudhir Phadke’)

चित्रपटाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, ” बाबुजी म्हणाले होते, कोणतेही गीत गाताना भावना त्या शब्दांसोबत आल्या पाहिजेत. केवळ सूर असून चालत नाही. तेव्हा त्याचे महत्व आम्हाला फारसे समजले नाही. परंतु हा चित्रपट पाहून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला. त्यांची देशभक्ती, त्यांनी सोसलेले कष्ट पाहाताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येतो. ही गाणी ऐकताना पुन्हा त्याच विश्वात गेल्याचा भास होतो. उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड यामुळे हा चित्रपट एका उंचीवर गेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी सुवर्णकाळ उभा केला असून महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना हा नक्कीच आवडेल, असा हा चित्रपट बनला आहे.”

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

8 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

10 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

11 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

12 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

12 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

13 hours ago