मनोरंजन

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आपल्या अपवादात्मक अभिनयाने कौशल्याने आणि अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी ओळखली जाते. त्याचप्रमाणे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने देशभरात ठसा उमटवला आहे. रश्मिका मंदान्नाचे गोंडस रूप आणि तिचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक आहे की प्रत्येकजण तिच्यासाठी वेडा झाला आहे, चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’चा टॅग देखील दिला आहे. रश्मिका मंदाना सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, परंतु अलीकडेच रश्मिकाने इन्स्टाग्रामवर तिचा मेकअप नसलेला सेल्फी पोस्ट केला आणि तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

भारताची राष्ट्रीय क्रश मानली जाणारी ही अभिनेत्री सहा वेगवेगळ्या भाषांमधील तिच्या अस्खलिततेमुळे प्रेक्षकांशी अनोख्या पद्धतीने जोडली गेलेली आहे. भाषेतील अडथळे तोडून, ​​ती अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आणि तिच्या चाहत्यांशी सखोल संबंध निर्माण करण्यात सक्षम झाली आहे. रश्मिकाने नुकताच तिचा नो मेकअप लूक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने हिरवा स्वेटर घातला आहे आणि ती तिच्या चेहऱ्यावर विखुरलेल्या केसांसह एक गोंडस पाउट बनवताना दिसत आहे. रश्मिकाने फोटोसोबत कॅप्शन लिहिलं, ‘मला कसं पाऊट करायचं ते कळत नाही त्यामुळे हे सरळ चुंबन आहे…’, अशा आशयाचे कॅप्शन टाकत तिने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

रश्मिकाचा हा फोटो खूपच सुंदर आहे. पण काही यूजर्सना अभिनेत्रीचा नो मेकअप लूक अजिबात आवडलेला नाहीये. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. लोकांनी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील एका केसावरुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही लोक तिला दाढी करण्याचा सल्ला देत आहेत, तर काही केसांना दाढी-मिशी म्हणत कमेंट तिला ट्रोल केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

रश्मिकाची अस्सल मराठमोळी नृत्य अदाकारी..!

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडाचे रिलेशन उघड? वाचा अभिनेत्रीने केलेली खास पोस्ट

अमृता फडणवीसांनी घेतले आशा भोसलेंकडून संगीताचे धडे!

रश्मिका मंदान्ना मुव्हीजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रश्मिकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘किरिक पार्टी’ या तेलगू चित्रपटातून केली. त्यानंतर साऊथमध्ये बॅक टू बॅक हिट चित्रपट तिने दिले. तिचे गीता गोविंदम, पुष्पा चित्रपट चांगलेच गाजले. देशभरातील मने जिंकणारी रश्मिका आता आता लवकरच बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. रश्मिकाचे आगामी चित्रपट म्हणजे रणबीर कपूरसोबतचा ‘अ‍ॅनिमल’ आणि अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार आहेत.

Rashmika Mandanna, Rashmika Mandanna trolled on instagram

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

10 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago