मनोरंजन

शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंग राहणाऱ्या जवानचा ट्रेलर अखेर गुरुवारी बारा वाजता प्रदर्शित करण्यात आला. धमाकेदार ॲक्शन सिक्वेन्स, उच्च दर्जाचे व्हिएफएक्समुळे 40 मिनिटातच पंधरा लाखाहून अधिक प्रेक्षकांनी युट्युबवर ट्रेलर पाहिला. शाहरुख आणि दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांचा ‘जवान’ चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोणने स्पेशल अपिअरन्स दिला आहे. ट्रेलरमध्ये काही सेकंदाच्या सीनमध्ये दीपिका पूर्णपणे भाव खाऊन जाते. नयनताराने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. सिनेमात अभिनेत्री प्रियमनी, सानिया मल्होत्रा, गिरीजा ओक-गोडबोले ॲक्शनमॉडमध्ये दिसून येत आहेत. ट्रेलरमध्ये दीपिकापादुकोण पासून नयनतारा सशक्त महिलांच्या भूमिकेत वावरत आहेत.

अभिनेता शाहरुख खान मुंबईत मेट्रोट्रेन हायजॅक करतो. आपल्या मागण्यांसाठी शाहरुख आतंकवादी का बनतो? शाहरुखची सैन्यदलातील पार्श्वभूमी काय? शाहरुख कोणाचा बदला घेतोय?  एका आई-मुलाचा, ‘जवान’चा बदला हे सिनेमाचं मूळ कथानक आहे.
हे सुद्धा वाचा 
आशिया कप २०२३: दुबळ्या नेपाळला बाबर आझमने झोडले !
इंडियाच्या संयोजकपदी शरद पवार यांचे नाव चर्चेत
बच्चू कडू को घुस्सा क्यु आया!; ऑनलाईन गेमिंगची जाहीरात सचिन तेंडुलकरला भारी पडणार!

शाहरुख जवान सिनेमात दुहेरी भूमिका साकारत असल्याचे सूत्रांची माहिती आहे. शाहरुख वडील आणि मुलगा या दुहेरी भूमिका साकारत आहे. सैन्यदलातील सैनिकाचा मुलगा दहशतवादी का बनतो, यासाठी तुम्हाला सात सप्टेंबर रोजी सिनेमा पहावा लागेल. सिनेमात विजय सेतुपती नकारात्मक भूमिकेत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

4 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

5 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

6 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

7 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

7 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

7 hours ago