मनोरंजन

राजस्थानच्या शाही किल्ल्यात आयोजित होणार विकी कौशल-कतरिनाचा लग्नसोहळा!

टीम लय भारी

मुंबई : लवकरच बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये लग्नातील सनईचे सूर ऐकायला मिळणार आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि चर्चित अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कतरिना आणि विकी कौशलचे ग्रँड वेडिंग केव्हा आणि कुठे होणार, हेही नव्या रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे (Vicky Kaushal Katrina’s wedding to be held at Rajasthan’s royal fort).

ETimes मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे ठिकाण आता निश्चित झाले आहे. रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीचे लग्न राजस्थान मधील रणथंबोर नॅशनल पार्कपासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सवाई माधोपूर येथील एका किल्ल्यात होणार आहे, ज्याचे नाव ‘सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा’ असे आहे.

Tadap: फिल्म ‘तडप’चा टीझर प्रदर्शित

शेहनाज गिलची दिवंगत सिद्धार्थ शुक्लासाठी खास पोस्ट

शाही विवाहसोहळा!

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ‘सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा’ हा 14 व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे.

कसा आहे हा किल्ला?

कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा असलेला किल्ला नक्कीच एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो. यामध्ये प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन, तसेच कॉकटेल आणि व्हिस्कीची सेवा देणारी तीन रेस्टॉरंट्स आहेत. किल्ल्यामध्ये एक स्पा देखील आहे, जो राणी पॅलेस आणि आजूबाजूच्या मंदिरांच्या मधोमध वसलेला आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे सेंट्रल प्रांगण पारंपारिक बागेत रूपांतरित केले गेले आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत.

कंगनाने सेलल्यूलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन

What Katrina Kaif Said About Her Rumoured Wedding To Vicky Kaushal

लग्नाची जोरदार तयारी!

रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीनेही त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी केले आहेत. ते सध्या कपड्यांसाठी फॅब्रिक निवडत आहेत, असे एका सूत्राने सांगितले. सूत्रांनी पुढे सांगितले की, कतरिनाने रॉ सिल्क फॅब्रिक निवडले आहे. कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सब्यसाची डिझायनर लेहेंगा परिधान करणार आहे.   कतरिना आणि विकीच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर दोघांचे चाहते खूप उत्सुक आणि आनंदी आहेत आणि आता त्यांच्या आवडत्या जोडप्याच्या भव्य लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कतरिना कैफ आणि विक्की कौशल दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहेत. विकी कौशलकडे सध्या आदित्य धरचा ‘अश्वत्थामा’ आहे, तर कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर 3च्या शूटिंगसाठी रशियाला जात आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

बराच वेळ बसल्याने पाठदुखीचा त्रास होतो का? मग आजपासून करा ‘हे’ सोपे व्यायाम

ऑफिस असो की घर, सततच्या कामामुळे आपल्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदना होतात. दिवसभर…

32 mins ago

सिक्स पॅक ऍब्स मिळवण्यासाठी करा ‘हा’ व्यायाम, जाणून घ्या

पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आहारासोबतच व्यायामही आवश्यक आहे. यासाठी सिट-अप हा जुना पण प्रभावी व्यायाम…

1 hour ago

Prithviraj Chavan यांनी भरपूर कामे केली, Atul Bhosle यांनी नुसतेच फलक लावले | कराडात हवा कुणाची ?

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

17 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

18 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

19 hours ago