31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनशेहनाज गिलची दिवंगत सिद्धार्थ शुक्लासाठी खास पोस्ट

शेहनाज गिलची दिवंगत सिद्धार्थ शुक्लासाठी खास पोस्ट

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री शेहनाज गिल सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. तिने दिवंगत सिद्धार्थ शुक्लासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून खास पोस्ट केली आहे. ‘तू यही है’… अशा नावाचे पोस्टर तिने शेअर केले आहे (Shehnaz Gill’s Special post for the late Siddharth Shukla).

खरं म्हणजे शेहनाज गिल तिच्या चाहत्यांसाठी नवीन अल्बम सॉंग घेऊन आली आहे.  ‘तू यही है’…  असे या अल्बम सॉंगचे नाव आहे. शेहनाजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या अल्बम सॉंगचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये शेहनाज आणि सिद्धार्थ हसताना दिसत आहेत.

कंगनाने सेलल्यूलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन

रणबीर कपूर -आलिया भट्ट डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ!

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

हे नवीन गाणे सिद्धार्थ शुक्लाला समर्पित करण्यात आले आहे. उद्या म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी, दु. १२ वाजता हे गाणे रिलीज होणार आहे. त्यामुळे या गाण्याबद्दल ‘सिडनाज’च्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Shehnaz Gill’s Special post for the late Siddharth Shukla
‘तू यही है’ हे गाणे सिद्धार्थ शुक्लाला समर्पित करण्यात आले आहे

विनोदाचा बादशाह… अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस

Shehnaaz Gill makes her first Instagram post since Sidharth Shukla’s death. Here’s what she shared

‘सिडनाज’ या जोडीने रिअलिटी शो बिग बॉस सीझन १३ मध्ये भाग घेतला होता. या सीझनचा विजेता दिवंगत सिद्धार्थ शुक्ला होता. तसेच या पूर्वी दोघांनी ‘भूला  दूंगा’ आणि ‘शोना शोना’ या सारख्या अल्बम सॉंगमध्ये एकत्र काम केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी