आरोग्य

काळी मान उजळण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा

आजकाल सर्वेचजण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतात. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतो. यासाठी आपण विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो, रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या ब्रँडचे फेसवॉश वापरतो, पण आपण आपल्या चेहऱ्यासोबतच आपली मान साफ ​​करायला विसरतो, का नाही? (Beauty Tips home remedies for black neck)

रिकाम्या पोटी अंकुरलेली मूग डाळ खाल्ल्याने आरोग्यास होणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या

अनेकदा चेहऱ्याकडे सर्वांचे लक्ष असते पण मानेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चेहरा आणि मानेचा रंग वेगळा दिसायला लागतो. जर मानेकडे लक्ष दिले नाही तर हळूहळू घाण साचू लागते आणि ती काळी पडू लागते. ते केवळ कुरूपच नाही तर त्याचे सौंदर्यही कुठेतरी हरवून जाते. यासाठी अनेक क्रिम्सचा वापर केला जात असला तरी मानेवरील काळेपणा तसाच राहतो. तर आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही स्मार्ट टिप्स, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या सोप्यापद्धतीने मानेवरील घाण साफ करू शकता. (Beauty Tips home remedies for black neck)

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

काळ्या मानेची समस्या जास्त सूर्यप्रकाशात जाणे, त्वचेत ओलावा नसणे किंवा इतर अनेक कारणांमुळे होऊ शकते. हे काही घरगुती उपाय आहेत जे काळ्या मानेपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. (Beauty Tips home remedies for black neck)

लिंबाचा रस
लिंबाचा रस मानेवर लावल्याने त्वचा स्वच्छ होते. लिंबाचा रस घेऊन मानेवर मसाज करा आणि 15-20 मिनिटांनी धुवा.

दूध आणि गुलाब पाणी
एक चमचा दुधात थोडेसे गुलाब जल मिसळून मानेला लावा. 15-20 मिनिटांनी धुवा. (Beauty Tips home remedies for black neck)

उन्हाळयात रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला होणार अनेक फायदे, जाणून घ्या

एलोवेरा
एलोवेरा जेल देखील मानेवरील काळेपणा दूर करण्यास मदत करते. एलोवेरा मानेला लावा आणि असेच राहू द्या. नंतर हळू हळू मसाज करा.

बेसन आणि दही
बेसन आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा आणि मानेवर लावा आणि कोरडे होईपर्यंत ठेवा. नंतर कोमट पाण्याने मान धुवा. (Beauty Tips home remedies for black neck)

हळद आणि दूध
दुधात हळद मिसळून मानेवर लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने मान धुवा.

आल्याचा रस
आल्याचा रस देखील मानेची त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतो. ते बारीक करून त्याचा रस मानेवर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. नंतर ते धुवा.

बदाम आणि मध
बदामाचे तेल आणि मध एकत्र करून मानेवर लावा आणि 20-30 मिनिटांनी धुवा.

काजल चोपडे

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

42 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago