आरोग्य

Corona update :  धनंजय मुंडे जिंकले, कोरोना हरला!

लय भारी टीम

मुंबई :  ना. जितेंद्र आव्हाड, ना. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ कोरोनावर मात करणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री ठरले आहे. गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.  कोरोनावर मात केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला आहे. सोशल मीडियावर जोरदार स्वागत सुरु झालं आहे.

धनजंय मुंडे यांना १२ जून रोजी श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य चार कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. भामरे, जोशी व दोन चालक यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. धनंजय मुंडे यांनी करोनावर मात केली असून आज सायंकाळी त्यांनाही सुट्टी देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

राजीक खान

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

16 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

16 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

17 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

17 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

17 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

18 hours ago