आरोग्य

संभाजी स्टेडियमची पूर्ती वाताहत ; मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सिडको परिसरातील नागरिकांसाठी एकमेव मोठे मैदान म्हणून संभाजी स्टेडियमकडे बघितले जाते. यासाठी लाखो करोडो रुपयांचा निधी देखील आला. परंतु आजची परिस्थिती फार दयनीय दिसून येत आहे एवढा मोठा खर्च होऊनही आज संभाजी स्टेडियम परिसरामध्ये विविध समस्यांनी नागरिक हैरान झाले असून ज्येष्ठ नागरिकांना येथील धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये मनपा अधिकारी याकडे मात्र कुठल्या प्रकारचे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी मनावर प्रशसनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सिडकोतील अश्विननगर परिसरातील संभाजी स्टेडियम येथील जॉगिंग ट्रॅकवर धुळीचे साम्राज्य तसेच स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने संभाजी स्टेडियमची दुर्दशा थांबवावी व सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(Completion of Sambhaji Stadium; Negligence of municipal officials)

सिडकोतील संभाजी स्टेडियम येथील जॉगिंग ट्रॅकवर दररोज सकाळी व सायंकाळी नागरिक फिरण्यासाठी येतात. येथील मैदानावर लहान मुले खेळतात. क्रिकेटचे सामने होतात. स्टेडियममधील जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारत नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच स्टेडियमवर स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत नाही. त्यामुळे या स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी ट्रॅकवर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.मनपात सध्या प्रशासकीय राजवट आहे. ट्रॅकवर पाणी तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात यावे यासाठी नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही मनपा अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रतिक्रिया

मागील दोन वर्षापासून मनपात प्रशासकीय राजवट आहे. असे असताना मनपा अधिकाऱ्यांनी संभाजी स्टेडियमची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. त्यामुळे आज अनेक समस्यांनी स्टेडियम चर्चेत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून लाखो करोड रुपयांचा पुरता चुराडा झाला आहे. यास सर्वस्वी मनपा अधिकारी सुनिता कुमावत या कारणीभूत असून त्यांच्यावर मनपा आयतानी कारवाई करावी.

अंकुश वराडे, सामाजिक कार्यकर्ते

संभाजी स्टेडियम : जॉगिंग ट्रॅकवर स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी

टीम लय भारी

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

17 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

18 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

18 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

18 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

18 hours ago