मनोरंजन

आलिशान घर, गाड्या अन्… कंगना रणौत आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण

भाजपनं (BJP)काल उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करत अभिनेत्री  कंगना रनौतला (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरवलं. मंडी हे तिचं मूळगाव आहे. मंडीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच कंगनाने एक पोस्ट शेअर करत भाजप (BJP) श्रेष्ठींचे आभार मानलेत. माझा नेहमीच भाजपला बिनशर्त पाठिंबा राहिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आज मला माझ्या जन्मभूमी हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय घेतला. त्याबद्दल आभार…, असं कंगना म्हणाली आहे.

काँग्रेस नेत्या प्रतिभा सिंह विद्यमान मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र ही जागा जिंकण्यासाठी भाजपने अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. राजकीय लढ्यात पहिल्यांदाच उतरलेली कंगना ही निवडणूक सहज जिंकू शकेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

2006 मध्ये अनुराग बासूच्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने सिनेसृष्टीत एन्ट्री केली. तिच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत तिने वो लम्हे, फॅशन, राज 2, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, क्वीन, तनु वेड्स मनू, मणिकर्णिका आणि पंगा असे अनेक चित्रपट दिले आहेत. तर जाणून घेऊयात तिच्या संपत्तीविषयी. ( Kangana Ranaut To Contest Election From Mandi Seat Know Her Net Worth)

कंगनाला घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू; पणजोबांनी काँग्रेसकडून जिंकली होती निवडणूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगनाची एकूण संपत्ती 90 कोटी रुपये आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 21 ते 25 कोटी रुपये मानधन घेते आणि बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

कारचं कलेक्शन

कंगनाला कारची खूप आवड आहे. तिच्याकडे BMW 7-Series, Mercedes Benz GLE SUV, Audi Q3 आणि Mercedes Maybach S-Class आहे.

कंगना आलिशान जीवन जगते. हिमाचल प्रदेशातील मनाली येथे तिचा एक आलिशान बंगला असून त्याची किंमत ३० कोटी रुपये आहे. मुंबईतदेखील तिंच ५ बीएचके घर आहे. त्याची किंमत 20 कोटी रुपये आहे. तसेच, तिचं मुंबईतील पाली हिल भागात 48 कोटी रुपये किमतीचे कार्यालय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थलायवी या चित्रपटासाठी तिनं 21 कोटी रुपये फी घेतली होती. चित्रपटांबरोबरच कंगना जाहिरातींमध्ये देखील काम करते.

शरद पवारांच्या मनातला डाव उलटला मग आता माढ्यात कुणाला संधी?

कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. 16 व्या वर्षी घर सोडून कंगना दिल्ली येथे गेली. दिल्लीमध्ये कंगनानं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.

धनश्री ओतारी

Recent Posts

३७५० मतदारांनी नोंदवले पोस्टल बॅलेटने मतदान

८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदानाची सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात मोहीम…

3 mins ago

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

20 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

20 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

21 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

21 hours ago