टीम लय भारी
नवी दिल्ली : जर्मनीमध्ये तब्बल १० हजार लोकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले. त्या देशांत येत्या काही महिन्यांत आणखी १ कोटी लोकांमध्ये हा आजार फैलावू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. दुसरे महायुद्ध आणि जर्मनीचे पुनर्घटन यानंतरचे ‘कोरोना’ हे देशावरील सर्वात मोठे संकट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, चॅन्सेलर म्हणून १४ वर्षाच्या कारकिर्दीत मर्केल यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. ‘परिस्थिती फारच गंभीर आहे. कृपया सगळ्यांनी गांभिर्याने घ्यायला हवे. ‘कोरोना’साठी सरकारी यंत्रणा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. आम्ही या विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. त्यातूनच जर्मनीची विकसित वैद्कीय यंत्रणा आणखी चांगले काम करेल. लोकांनी आपापसांपासून अधिक अंतर ठेवावे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. लोकांचे जीवन सावरण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची देशाला गरज आहे. आपण एका युद्धस्थळी आहोत. आपला लोकशाही देश आहे. पुढचा आठवडा आपल्यासाठी आणखी अवघड असेल.’ अशा शब्दांत मर्केल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जगभरातील ‘कोरोना’ची स्थिती खालीपप्रमाणे आहे
हे सुद्धा वाचा
VIDEO : ‘कोरोना’च्या खबरदारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंचे बहुमोल ६ संदेश, प्रत्येकाने ऐकायलाच हवेत !
अजितदादांचा निर्णय : ‘करोना’साठी होऊ दे खर्च !
Breaking : ‘करोना’मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…