31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeआरोग्य‘कोरोना’ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट, जर्मन राष्ट्रप्रमुखांनी देशाला केले संबोधित

‘कोरोना’ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट, जर्मन राष्ट्रप्रमुखांनी देशाला केले संबोधित

टीम लय भारी

नवी दिल्ली : जर्मनीमध्ये तब्बल १० हजार लोकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले. त्या देशांत येत्या काही महिन्यांत आणखी १ कोटी लोकांमध्ये हा आजार फैलावू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. दुसरे महायुद्ध आणि जर्मनीचे पुनर्घटन यानंतरचे ‘कोरोना’ हे देशावरील सर्वात मोठे संकट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, चॅन्सेलर म्हणून १४ वर्षाच्या कारकिर्दीत मर्केल यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. ‘परिस्थिती फारच गंभीर आहे. कृपया सगळ्यांनी गांभिर्याने घ्यायला हवे. ‘कोरोना’साठी सरकारी यंत्रणा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. आम्ही या विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. त्यातूनच जर्मनीची विकसित वैद्कीय यंत्रणा आणखी चांगले काम करेल. लोकांनी आपापसांपासून अधिक अंतर ठेवावे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. लोकांचे जीवन सावरण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची देशाला गरज आहे. आपण एका युद्धस्थळी आहोत. आपला लोकशाही देश आहे. पुढचा आठवडा आपल्यासाठी आणखी अवघड असेल.’  अशा शब्दांत मर्केल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जगभरातील ‘कोरोना’ची स्थिती खालीपप्रमाणे आहे

  • जगभरात तब्बल २ लाख लोकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ८० हजार जण उपचारानंतर बरे झाले आहेत
  • ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत.
  • ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच प्रवासावर निर्बंध घातले आहेत
  • इराणमध्ये ‘कोरोना’ची लागण झालेल्या ११३५ जणांचे मृत्यू
  • तुर्कस्तानमध्ये ९८ जण रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे
  • ट्युनिशियाने संचारबंदी लागू केली आहे
  • नायजेरियाने ‘कोरोना’ग्रस्त १३ देशांमध्ये प्रवास करण्यास नागरिकांना बंदी घातली आहे. यामध्ये चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, स्पेन, जपान, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, अमेरिका, ब्रिटन, नेदरलॅंड आणि स्विर्त्झलॅंड या देशांचा समावेश आहे.
  • तब्बल १६४ देशांमध्ये ‘कोरोना’चा फैलाव झाला आहे
  • कॅनडातील पाच राज्यांनी आणीबाणी घोषित केली आहे
  • अमेरिकेमध्ये ६२६४ ‘कोरोना’बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११२ जणांचा मृत्यू झाला आहे
  • अमेरिकेन एक विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या समस्या – वैद्यकीय उपचार, तपासणीचा खर्च, आजाराची रजा, खाद्यान्न, बेरोजगारीसाठी यासाठी नागरिकांना अनुदान दिले जाणार आहे
  • कोलंबियाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे
  • इटलीमध्ये गेल्या २४ तासांत ४७५ जणांचा नव्याने मृत्यू झाला आहे. इटलीत आतापर्यंत २९७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • बेल्जियमनेही आपल्या देशातील सगळे व्यवहार थांबविले आहेत
  • स्पेनने देशातील सगळी हॉटेल्स बंद केली आहेत. पर्यटकांना निघून जाण्यास सांगितले आहे
  • चीनमध्ये १७ मार्च रोजी १३ रुग्ण आढळले आहेत, ११ जणांचे मृत्यू झाले आहेत. १६ मार्च रोजी १३ जणांचे मृत्यू झाले होते
  • चीनमध्ये आतापर्यंत ८०,८९४ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६९,६०१ रूग्ण बरे झाले आहेत, तर ३ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • दक्षिण कोरियामध्ये ८,३०० रूग्ण आढळले आहेत
  • जपानमध्ये ८७३ रूग्ण आढळले आहेत
  • भारतामध्ये आतापर्यंत १५१ रूग्ण आढळले आहेत. परदेशात असलेल्या २७६ भारतीयांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी एकट्या इराणमध्येच २५५ जण आहेत. भारतात आतापर्यंत ४० हजार जणांना क्वारंटाईन केले आहे.
  • दक्षिण आफ्रिकेमध्ये ११६ रुग्ण आढळून आले आहेत
  • नायजेरियामध्ये ८ रूग्ण आढळून आले आहेत

हे सुद्धा वाचा

VIDEO : ‘कोरोना’च्या खबरदारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंचे बहुमोल ६ संदेश, प्रत्येकाने ऐकायलाच हवेत !

अजितदादांचा निर्णय : ‘करोना’साठी होऊ दे खर्च !

Breaking : ‘करोना’मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी

‘करोना’बाबतच्या खोट्या मेसेजमुळे सरकारपुढे डोकेदुखी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी