आरोग्य

नाशिक स्मृतिभ्रंशचा धोका वेळीच ओळखत व्‍हा सतर्क डॉ.आनंद दिवाण

वयाची साठी ओलांडल्‍यानंतर स्‍मृतिभ्रंश (डिमेंशिया) या आजाराचे निदान होणार्या रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ होते आहे. हा आजार होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. रुग्‍णांपेक्षा त्‍यांच्‍या नातेवाईकांना लक्षणे लक्षात येत असल्‍याने, त्‍यांनी वेळीच धोका ओळखत रुग्‍णावर उपचार सुरु करण्यास सहाय्यता केली पाहिजे. योग्‍य निगा राखत रुग्‍णाच्‍या आरोग्‍याची काळजी घ्यावी, असे आवाहन नारायणी हॉस्पिटल चे मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉ. आनंद दिवाण यांनी केले.कॉलेज रोडवरील डिसूझा कॉलनी येथील सखी मंडळातर्फे आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. दिवाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मिना कुलकर्णी उपस्तित होत्या.

डॉ. दिवाण म्हणाले, नजीकच्‍या आठवणींचा विसर पडणे, एखादी वस्‍तु कुठे ठेवली याचे विस्‍मरण होणे, एखादा निरोप विसरणे अशा छोट्या छोट्या घटनांतून नातेवाईकांना या आजाराची पूर्वकल्‍पना येऊ शकते. रुग्‍णांना ही बाब लक्षात येईलच असे नसते. काही प्रमाणात स्‍मृतीभ्रंश हा आजार अनुवंशिकतेवर आधारलेला असून, चुकीची जीवनशैली यामुळेही या आजाराचा धोका वाढतो. त्‍यामुळे वेळेवर जेवण करणे, सकस आहार घेणे, कुठलेही व्‍यसन टाळणे, नियमित व्‍यायाम करणे. यामध्ये शारीरीक व मानसिक व्‍यायामावर भर देणे. आपले आवडीचे छंद जोपासणे या बाबींतून संभाव्‍य धोका टाळता येऊ शकतो. उच्च रक्‍तदाब, मधुमेह असलेल्‍या रुग्‍णांनी वेळीच औषधे घेतांना व डॉक्‍टरांच्‍या सल्‍याने नियमित तपासण्या करुन घेतांना हे आजार नियंत्रणात ठेवले पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला.

पुढे डॉ.दिवाण म्‍हणाले, स्‍मृतिभ्रंश या आजाराचे निदान करतांना पूर्वइतिहास जाणून घेतला जातो. तसेच निदानासाठी आवश्‍यकतेनुसार एमआरआय, रक्‍तचाचण्यांचे अहवाल आदींचा आधार घेतला जातो. आजाराच्‍या तीव्रतेनुसार औषधोपचार ठरविला जातो. रुग्‍णांना साधारणतः १ ते ३ वर्षांपर्यंत या औषधोपचाराचा फायदा होत असला तरी यानंतरच्‍या कालावधीत रुग्‍णांची काळजी घेणे, त्‍यांचे दैनंदिन काम सुरु राहातील, यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमूद केले.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

2 days ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago