आरोग्य

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळणारे जबरदस्त फायदे

बडीशेप ही सर्वांच्याच घरी असते(Drinking fennel seeds water has many health benefits). माऊथ फ्रेशनर म्हणून लोक याचे सेवन करतात. याशिवाय कोणी लोक मसाल्यांमध्ये देखील बडीशेपचा वापर करतात. बडीशेप ही लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. आपण कुठे पण बाहेर जेवण करायला गेलो की बिल देतांना वेटर आपल्याला बडीशेप आणून देतो आपणही ती खातो. तस पहिले तर आपण रोज बडीशेप खालली पाहिजे. यामध्ये आढळणारे पोषक तत्व आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीरठरतात.बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म आहेत, जे पचनानंतर रक्तात विरघळतात आणि विविध गोष्टी करतात. चला तर मग आम्ही तुम्हाला बडीशेपच्या पाण्याचे फायदे सांगत आहोत. बडीशेपमध्ये फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, मँगनीज, कोलीन, बीटा-कॅरोटीन, ल्युटीन, झेक्सॅन्थिन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. बडीशेप शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन मध्ये देखील मदत करते. हे मूत्रपिंड आणि यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे शरीरातून हानिकारक घटक सहज बाहेर काढले जातात.यामुळे शरीरातील सूज, जळजळ यासारख्या समस्या कमी होतात. या परिस्थितींना प्रतिबंध केल्याने, कर्करोगासह अनेक धोकादायक आजारांचा धोका कमी होतो.

बडीशेप फायबरचा समृद्ध स्रोत आहे, जी तुम्हाला जास्त काळ पोटभर राहण्यास मदत करते आणि तुमची लालसा शांत करते. अशा स्थितीत तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही बडीशेप देखील सेवन करा. यामुळे शरीरात एंझाईम्सचा उत्पादन वाढते. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात.जर तुम्हाला पोटाची समस्या असेल तर बडीशेप खाणे खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना गॅसची समस्या आहे त्यांनी याचे सेवन जरूर करावे, कारण यामुळे पोटाचे स्नायू शांत होतात.असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

9 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

10 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

11 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

15 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

15 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

17 hours ago