राजकीय

लंके फॅक्टर सुजय विखेंना भारी पडणार…….

१० मार्च १९८० साली पारनेर तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले निलेश लंके आज हि सामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत(Nilesh Lanka factor will fall heavily on Sujay Vikhe Patil). अर्थात हि लोकप्रियता वारसा हक्काने मिळवलेली नसून त्यांनी ती कमवलीये. पारनेर तालुक्यात अगदी सुरुवातीला चहाचं एक साधं हॉटेल त्यांनी सुरु केलं , सुरुवातीला ते फार काही चाललं नाही, पण त्यानंतर लोकसंपर्क वाढल्याने लंके ग्रामपंचायतीला उभे राहिले आणि विशेष म्हणजे त्यांचं पॅनल या निवडणुकीत निवडूनही आलं. आणि निलेश लंके सरपंच झाले. त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी ‘’निलेश लंके प्रतिष्ठान’’ सुरु केलं , त्या माध्यमातून ठिकठिकाणी सामाजिक कार्याला सुरुवात केली. अगदी तळागाळातील जनसामान्यांपर्यंत ते पोहचले. कोरोना काळात त्यांनी लोकांना केलेली मदत खूपच महत्वाची ठरली , कोरोना काळात ते उदयाला आले असंही म्हणणं वावगं ठरणार नाही.त्यांची हीच वाढती लोकप्रियता पाहून २०१९ ला शरद पवारांनी लंके यांना उमेदवारी दिली आणि अर्थात पवारांचा निर्णय योग्य ठरला , लंके पारनेर मतदार संघाचे आमदार झाले.
पण आता मात्र २०२४ च्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत जो तो तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे धावा करत असताना लंके देखील शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले. अर्थात नंतर आपण चुकलो कि काय याची जाणीव त्यांना झाली. शरद पवारांमुळे आपण आमदार झालो असलो, तरी अजित पवारांनीही आपल्याला पाठबळ दिलेलं,अशा संभ्रमावस्थेत ते अडकलेले. पण आपण निवडून आलो ते जनसामान्यांमुळे,त्यांनी पवारांच्या गटाला मत दिलेलं … मला नाही ,असा विचार करूनच त्यांनी पुन्हा शरद पवारांकडे येण्याचा निर्णय घेतला.नक्कीच हा निर्णय अजित पवार गटासाठी फार तोट्याचा ठरण्याची शक्यता आहे.
पण निलेश लंके लोकप्रिय असले तरी पुढे विखे पाटलांचं साम्राज्य असताना हि टक्कर फार अटीतटीची ठरणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का देणं निलेश लंकेना शक्य आहे का ….. प्रवरा नगर हे शक्ती पीठ असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री मंडळातील ताकदीचे मंत्री आहेत. २०१९ च्या निवडणुकीत सुजय विखे पाटलांनी संग्राम जगताप यांना २ लाख ८१ हजार ४७४ मतांनी हरवत त्यांचा गड राखला खरा , पण तरीही कमी जनसंपर्क आणि त्यांच्या वर्तवणुकीमुळे बऱ्याचदा त्यांच्या विषयी तक्रार होताना दिसते. मागे सुजय विखे पाटील यांनी इंग्रजी बोलता न येण्यावरून जेव्हा निलेश लंकेची टिंगल केली होती त्याची बरीच चर्चा हि झाली. कार्यकर्त्त्यांकडून विखे पाटलांविषयी नाराजीचा सूर दिसून आला. पण त्याला प्रत्युत्तर देत , इंग्लिश बोलण्यापेक्षा संसदेत सामान्यांचे कोण-किती प्रश्न मांडू शकतो हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, विकासाच्या मुद्यावर मला निवडणूक लढायची आहे कोणावर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करून नाही, विखे पाटलांना पैशाची मस्ती आहे, असे हि लंके म्हणाले.
२०२४ मध्ये अहमदनगर मतदार संघाची निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील हि लढत जितकी अटीतटीची असणार तितकीच रंजक ही ठरणार आहे. नगर लोकसभा मतदार संघाचे ६ विधानसभा मतदार संघ पडतात, ज्यामध्ये शेगाव मध्ये मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत, राहुरी मध्ये तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ),अहमदनगर संग्राम जगताप (अजित पवार गट ), पारनेरमध्ये निलेश लंके ( शरद पवार गट ), श्रीगोंदा बबनराव पाचपुते (भाजप ), आणि कर्जत जामखेड रोहित पवार (शरद पवार गट) आहेत. एकूण चित्र पाहता महायुतीच्या ३ जागा तर महाविकास आघाडीच्या इथे ३ जागा आहेत.आणि एकूण सगळं चित्र पाहता निलेश लंकेंचीच हवा या भागात तुम्हाला पाहायला मिळेल. अजित पवारांनी मागे ‘’निलेश आमचा पारनेर मध्ये जरी लोकप्रिय असला तरी त्याने लोकसभेचा विचार करू नये’’ असं वक्तव्य केलेलं. पण लंके पवारांसोबत आल्याने आता अजित पवारांचीच कोंडी झालेली दिसून येतेय.
तर असे हे निलेश लंके ,जनसामान्यांतील नेता.. ज्याला कुठल्याच PR टीम ची वा सोशल मीडियाची गरज नाहीये प्रसिद्धीसाठी, त्यांच्या विषयी बोलताना लोक आवर्जून म्हणतात कि ‘’हाक मारेन तिथे उभा राहणारा माणूस’’ म्हणजे निलेश लंके.
सध्या अनेक राजकीय भूकंप होत असताना निलेश लंकेंचं पुन्हा शरद पवारांकडे येणं अनेक कार्यकर्त्यांना विचार करायला लावणार हे नक्की. निलेश लंके फॅक्टर सुजय विखेंना किती भारी पडणार याकडे आता सर्वांचच लक्ष असणार आहे ….

टीम लय भारी

Recent Posts

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

14 mins ago

नाशिकरोडमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी

भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक((BJP corporator) व पदाधिकारी कामगार नेता (office-bearers) यांच्या मध्ये दत्त…

44 mins ago

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

18 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

19 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

20 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

24 hours ago