आरोग्य

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार

टीम लय भारी

नवी दिल्ली: भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देऊन ही मोहीम वेगाने राबवण्यात आली. आज २७७ दिवसात भारताने विक्रमी कामगिरी केली आहे (India’s New Record! 100 crore vaccination stage crossed).

या ऐतिहासिक दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर जगातील सर्वात मोठा ध्वज फडकवला जाणार आहे. तसेच देशातील या सुवर्ण कामगिरीमुळे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. देशातील १०० ऐतिहासिक वास्तुंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

corona vaccine : महाराष्ट्रासाठी उद्याचा दिवस ठरणार अत्यंत महत्त्वाचा!

याद्वारे सर्व आरोग्य कर्मचार, फ्रंटलाईन वर्कर्स, वैज्ञनिका, लस उत्पादक यांचा सन्मान करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहली जाणार आहे. (India crosses milestone of 100-crore Covid-19 vaccine doses)

कोविन डॅशबोर्डच्या माहितीनुसार, आतापर्यंत १०० कोटी १५ हजार ७१४ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ७० कोटी ८३ लाख १८ हजार ७०३ जणांनी पहिला डोस घेतला असून २९ कोटी १६ लाख ९७ हजार ११ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

Corona Vaccine : कोरोना लसीचे १० टक्के डोस कच-यात जाणार! सरकारला १३२० कोटींचा अतिरिक्त खर्च

1 billion’ doses live: Triumph of collective spirit of 130 crore Indians, PM says

यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार एका वृत्तवाहिनीसोबत बातचित करताना म्हणाल्या की, आजचा दिवस हा सर्व भारतवासियांसाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. भारताची ओळख आत्मनिर्भर असून लस तयार करून ९ महिन्यांत १०० कोटी लसीकरण पार करणारा देश ठरला आहे.

मी सर्वांचेच आभार व्यक्त करते. यामध्ये प्रचंड मोठे योगदान असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक या सर्वांनी खूप मेहनत केली आहे. तसेच देशातील सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात सातत्याने पालकांसारखे लक्ष्य ठेवून प्रत्येक ठिकाणी लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. प्रत्येक राज्यासोबत संवाद साधून अडचणीवर मात करत १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला आहे. आज अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

3 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

3 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

6 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago