31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईCoronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी 'कोविशिल्ड'ची ऑर्डर, पुण्यातून...

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

टीम लय भारी

मुंबई : देशात 16 जानेवारीपासून कोरोना व्हॅक्सीनेशन (Coronavirus Vaccine) सुरू होणार आहे. मंगळवारी सकाळी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या पुणे येथील प्रॉडक्शन सेंटरमधून कोविशील्डची पाहिली बॅच कडेकोट बंदोबस्तात डिस्पॅच झाली आहे. केंद्र सरकारने सोमवारी ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेकाची व्हॅक्सीन कोविशील्डसाठी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एक कोटी 10 लाख डोसची आहे. ऑर्डरनुसार, व्हॅक्सीनच्या एका डोसची किंमत 200 रुपये आहे. यावर 10 रुपये जीएसटी लागेल. म्हणजे किंमत 210 रुपये असेल.

3 डिग्री तापमानात ठेवल्यात व्हॅक्सीन

कोविशील्ड व्हॅक्सीनचे बॉक्स पुणे एयरपोर्टला घेऊन जाण्यासाठी तीन कंटेनर ट्रक बोलावण्यात आले. या ट्रकमध्ये व्हॅक्सीन तीन डिग्री तापमानात ठेवून पुणे एयरपोर्टवर पोहचवण्यात आली, जिथून एकुण 8 उड्डाणे कोविशिल्ड व्हॅक्सीन 13 विविध ठिकाणांवर घेऊन जाईल. पहिले फ्लाइट दिल्ली एयरपोर्टसाठी रवाना होईल. नंतर दिल्लीहून व्हॅक्सीन देशाच्या विविध भागात पाठवली जाईल.

एचएलएल लिमिटेडने दिली आर्डर

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ट्विट करून सांगितले की, कोविशिल्ड व्हॅक्सीनसाठी पब्लिक सेक्टरची कंपनी एचएलएल लिमिटेडने सरकारकडून ऑर्डर जारी केली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने 3 जानेवारीला कोविशील्डला मंजूरी दिली होती. आठवड्याभरात कोविशील्डचे एक कोटीपेक्षा जास्त डोस पुरवले जाऊ शकतात. सुरूवातीला व्हॅक्सीनचे डोस 60 पॉइंटवर पाठवले जातील. तेथून पुढे ते पाठवले जातील. हेल्थ मिनिस्ट्री लवकरच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनसाठी सुद्धा विक्री आदेशावर हस्ताक्षर करणार आहे.

व्हॅक्सीनचे डोस 60 वेगवेगळ्या पॉइंटवर पाठवणार

सीरम इन्स्टीट्यूटच्या सूत्रांनी सांगितले की, सुरूवातीला व्हॅक्सीनचे डोस 60 वेगवेगळ्या पॉइंटवर पाठवले जातील. तेथून ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पुढे पाठवले जातील. पुण्यातील एक कंपनी कुल एक्सने देशभरात व्हॅक्सीन पोहचवण्याची तयारी केली आहे.

या डेस्टिनेशनवर होईल डिलिव्हरी

देशभरात 41 डेस्टिनेशन (एयरपोर्ट) ठरवण्यात आले आहेत, जिथे व्हॅक्सीनची डिलिव्हरी होईल. उत्तर भारतात दिल्ली आणि करनालला मिनी हब बनवण्यात आले आहे. पूर्व क्षेत्रात कोलकाता आणि गुवाहाटीला मिनी हब नवण्यात आले आहे. गुवाहाटीला संपूर्ण नॉर्थ-ईस्टसाठी नोडल पॉइंट बनवले आहे. चेन्नई आणि हैद्राबाद दक्षिण भारतासाठी पॉइंट्स आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी