आरोग्य

स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू

डेंग्यू, मलेरियाची साथ आटोक्यात येत नाही तोच स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून मालेगावच्या ६५ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने (swine flu) मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाईने फ्लूने मृत्यू झाला. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे. यामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून स्वाईन फ्लू संशयित रुगणांचा शोध घेतला जात आहे. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेणयाचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.(Malegaon woman dies of swine flu)

गेल्यावर्षी शहरात डेंगूने थैमान घातले होते. परंतु सद्यस्थितीत स्वाईन फ्लूच्या रूपाने शहरवासीयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शहरात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने चाळीशी पार केली. त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहे. या रुग्णांच्या संपर्कातील रुगणाचे स्वब घेण्यात आले आहेत. सिन्नर आणि मालेगाव येथील दोन्हीही महिला रूग्णांचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

सिन्नर तालुक्यातील दातलीच्या महिलेपाठोपाठ मालेगावच्या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. रूग्णांना काही लक्षणे जाणवल्यास घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा. हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये. घसा खवखवत असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जावे.
– डॉ तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago