राजकीय

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या भाजपा उमेदवार नितीन गडकरींवर कारवाई कधी?;अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Atul Londhe ) यांनी केला आहे. यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान (When will action be taken against BJP candidate Nitin Gadkari for violating model code of conduct?; Atul Londhe)

वैशाली नगर भागात भाजपा उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे व अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने तक्रार दाखल केली होती, या तक्रारीची दखल घेऊन शाळा संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे पण शाळकरी मुलांना प्रचारासाठी बोलावणारे व त्यासाठी शाळेवर दबाव टाकणा-या नितीन गडकरी आणि भाजपावर काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात नितीन गडकरी आणि शाळेचे संचालक दोघेही दोषी आहेत त्यामुळे नितीन गडकरींवरही कारवाई झाली पाहिजे असे अतुल लोंढे म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

43 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

3 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago