आरोग्य

हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; पाहा सोपी रेसिपी

टीम लय भारी

मुंबई : हिवाळा सुरु झाला की, वातावरणात कडाक्याची थंडी जाणवू लागते.त्यामुळे या थंडीमुळे सर्दी,खोकला असे अनेक आजार बळावत असतात. त्यामुळे अनेकजण हिवाळ्यात आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्या आहारात बदल करतात म्हणजेच एकंदरीत संपूर्ण जीवनशैलीमध्येच बदल करतात. तसेच हिवाळ्यात अनेक उष्ण आणि पौष्टीक पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची जय्यत तयारी सुरु असते. त्यात आता जानेवारी महिन्याला काहीच दिवस उरले असून, मकरसंक्रात या सणानिमित्त तीळगुळ बनवण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळते. या हंगामात तीळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु झाली(Sesame seeds eating Health benefits in winter).

तीळामध्ये मुळत: उष्ण गुणधर्म असल्यामुळे ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरते.अनेकजण हे तीळगुळ बनवण्यासाठी वेळ नसल्यामुळे हल्ली बाजारातून तीळगुळ विकत आणतात.मात्र जाणून घ्या कमीतकमी वेळात आणि सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे तीळगुळ बनवतात.

थंडीत प्या हॉट लसणाचं सूप

लाल केळीचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

साहित्य

  • अर्धा किलो तीळ
  • अर्धा किलो चिक्कीचा गुळ
  • १ ते २ चमचे तूप
  • १ ते दीड वाटी कुटलेले शेंगदाणे
  • १ चमचा वेलची पूड

औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत? औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Heath Benefits Of Sesame Seeds: 5 Reasons To Include Til In Your Winter Diet

कृती

  • प्रथम मंद आचेवर तीळ भाजून घ्या.
  • एखादे मोठे भांडे गॅसवर ठेवून त्यात चिक्कीचा गुळ आणि तूप घाला.
  • गुळाचा व्यवस्थित पाक तयार करुन घ्या.
  • पाक गोळीबंद झाल्यावर त्यात भाजलेले तीळ, दाण्याचा कूट वेळची पूड घाला .
  • मिश्रण एकजीव करुन,तीळगुळ वळून घ्या.
  • हाताला तूप लावल्यास लाडू वळताना हाताला चिटकत नाही.
  • https://youtu.be/fIgrAbv2V08
Team Lay Bhari

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

9 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

9 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

10 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

11 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

12 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

13 hours ago