आरोग्य

नव्या कोरोना विषाणूनं जगाला पुन्हा धडकी, पाहा किती धोकादायक आहे ओमीक्रॉन?

टीम लय भारी

नवी दिल्ली: कोरोनाचा पराभव झाला असं वाटत असतानाच आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूनं धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. त्याला गेल्या काही दिवसात न्यू नावानं ओळखलं गेलं(The corona virus has hit the world again)

पण जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमीक्रॉन असं नाव दिलेलं आहे. कोरोनाचा हा नवा अवतार दुसऱ्या लाटेतल्या डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे. अजून तरी आपल्याकडे ओमीक्रॉनची लागण झालेला एकही रुग्ण मिळालेला नाही.

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

पण तो सापडणारच नाही असं सांगता येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना अलर्ट रहायला सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर तर सतर्क रहाणं अत्यंत गरजेचं आहे.

काय आहे नेमका ओमीक्रॉन (Omicron) विषाणू?

ओमीक्रॉन (B.1.1.529 ) हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे. विशेष म्हणजे तो सतत बदलत रहातो. चालू महिन्यात आफ्रिकेतल्या बोत्सवाना देशात तो पहिल्यांदा सापडला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, मोझंबिक, इस्टोनियासह सहा देशात त्याची लागण झालेले रुग्ण मिळाले.

Corona Vaccine : कोरोना लसीचे १० टक्के डोस कच-यात जाणार! सरकारला १३२० कोटींचा अतिरिक्त खर्च

New corona variant puts Telangana on high alert 

गेल्या आठवड्याभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजारापेक्षा जास्त झालीय. हा विषाणू वेगानं फैलावतो आणि त्याचा संसर्गही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं निदर्शनात आलंय.

विशेष म्हणजे लस घेतलेली असेल तरीसुद्धा ओमीक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं अभ्यासात स्पष्ट झालंय. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत मृत्यूचं तांडव करणाऱ्या डेल्टापेक्षाही ओमीक्रॉनचा धोका अधिक आहे.

कुठे काय घडतं आहे?

आफ्रिकेत नव्या कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर इंग्लंड, इस्त्रायनं सहा आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंद घातलीय. ज्यात दक्षिण आफ्रिका, नामीबिया, झिम्बाब्वे, लिसोथो, एसवानिटी देशांचा समावेश आहे. पोर्तुगालमध्ये जिथं जगातलं सर्वाधिक लसीकरण झालंय, तिथेही रुग्ण जास्त सापडल्यामुळे आणीबाणी घोषीत केलीय.

निर्बंध लादलेत. झेक रिपब्लिकमध्ये लॉकडाऊनची स्थिती येताना दिसतेय. जर्मनी, फ्रान्स, अमेरीकेतही नव्या रुग्णांचा आकडा लाखात जातोय. त्यामुळेच नव्या कोरोनानं जगाला पुन्हा एकदा धडकी भरलीय.

नव्या कोरोनाची तपासणी कशी होणार?

आफ्रिकेतल्या जवळपास सर्वच देशात हा विषाणू सापडतो आहे. जर्मनीत तर मृत्यूचं तांडव निर्माण झालंय. रुग्णसंख्या 72 हजाराच्या पुढे गेलीय तसच 381 नव्या मृत्यूची नोंद केली गेलीय. फ्रान्समध्येही 34 हजार नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हे सगळे आकडे भीती निर्माण करणारे आहेत.

हा विषाणू एवढाच घातक असेल तर त्याची तपासणी कशी होते हा प्रश्नही साहजिकच पडतो. तर त्याचं उत्तर आहे, आता जसा तपास होतो तसाच नव्या कोरोनाचीही तपासणी होईल.

त्यामुळे नव्या विषाणूसाठी नवी तपासणी पद्धत अजून तरी गरजेची नसल्याचं जाणकार सांगतायत. त्यामुळे RTPCR टेस्टनेच तपासणी होईल. खर्च वाढण्याची शक्यता नाही.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 mins ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

40 mins ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 hour ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago