महाराष्ट्र

होऊ दे दूध का दूध पानी का पानी…! अॅड आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरे यांना आव्हान

अडीच वर्षात राज्यात प्रकल्प यावे म्हणून तुम्ही प्रयत्न करून प्रस्ताव आणले असतील, यावर तुम्ही ठाम असाल तर माझ्या या मागणीला समर्थन करा. या अडीच वर्षाच्या काळामध्ये नेमके किती प्रस्ताव आले? किती कोटींचे आले? कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते. ते प्रत्यक्षात सुरू झाले का? सुरू नाही झाले? या सगळ्याची अडीच वर्षाच्या काळातील निवृत्त मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी…होऊ दे दूध का दूध पानी का पानी.. असे आव्हान भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिले. आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पलटवार केला.

यावेळी शेलार की, आदित्य ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद ऐकून पेंग्विनने डोक्याला हात मारला असता. आदित्यजी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा धरत आहे विसरलात का? अडीच वर्ष आपले पिताश्री मुख्यमंत्री होते. त्यांनी ना विधानसभेत एका प्रश्नांचे उत्तर दिले ना विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली. आपले पिताश्री मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय आणि दुसरे कोणी मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय या पद्धतीच्या भूमिकेवर पेंग्विनने डोक्यावर हात मारला असता. आम्ही तर माननीय उद्धवजींच्या अशा मुलाखती ऐकल्या की ज्यामध्ये नवाब मलिक विषयावर प्रश्न विचारू नका, तरच येतो अशाही मुलाखती आम्ही पाहिल्या. मग अशा बाबतीतील गोष्टी स्पष्ट केल्यावर पेंग्विनला हसे येईल म्हणून आदित्यजी असे वायफळ प्रयत्न करू नका. बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी दिल्लीत जाणे आवश्यक होते. आदित्यजी तुम्ही आणि तुमचे सहकारी सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींना भेटलेले आम्ही पाहिले पण या प्रस्तावासाठी तुम्ही एकही भेट केंद्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांशी किंवा प्रधानमंत्री कार्यालयाशी केलेली दिसलेली नाही. स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मात्र पुढे अग्रेसर, मात्र, राज्यातील आपल्या मुलांच्या नोकऱ्यासाठी कदमताल करतायत. या पद्धतीने राज्य अडीच वर्ष चालल्यामुळे आजची राज्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आदित्यजी तुम्ही मनसुख हिरेनलालचा खून विसरलात का? याच राज्यातील मुंबई शहरात राहणाऱ्या एका मोठ्या उद्योजकाच्या घरासमोर स्फोटकांची गाडी या सगळ्यातून काय संदेश दिला जातो. व्यवसायिकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी वाझे ते तत्कालीन गृहमंत्री हे तुमच्या दिमतीला होते. याच राज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरावर स्फोटक लागली जातात. पोलिसांचे अधिकारी वसुलीचे काम करतात आणि सामान्य माणसाचा खून होतो. उद्योग येतील कसे? त्यावेळेला तुमच्या कुकृत्याने तुम्ही उद्योग येऊ दिले नाहीत. आताच्या तीन महिन्यात प्रयत्न करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला त्यावेळच्या कुकृत्याने आणि आताच्या कुप्रचाराने तुम्ही उद्योग येवू देत नाही आहात. सफल काय होणार आहे. वेदांत फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन यामध्ये फरक करून तुम्ही भ्रम फैलावण्याचा प्रयत्न करत आहात.असे ही शेलार यावेळी म्हणाले.

शेलार म्हणाले, फॉक्सकॉन वेंदातचा प्रश्न असेल तर आमच्याकडेही पत्र आहे. तर वेंदातचे अनिल अगरवाल यांनी स्वतः १४ सप्टेंबरला केले आहे की, आम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये दोन वर्षापासून जागा शॉर्टलिस्ट केल्या होत्या.त्याबाबत प्रयत्न करत आहोत. पुढे अग्रवाल असे म्हणतात की, गुजरातने दिलेला प्रस्ताव जास्त सवलतीचा होता आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच भागामध्ये अजून प्रस्ताव घेवुन येत आहोत. स्वतः वेदांतचे मालक जे सांगतात त्यापेक्षाही वेगळं जर तुम्ही सांगत असाल तर पेंग्विनलाही हसवण्याचा हास्य खेळ तुमच्या पत्रकार परिषदेला म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? या सगळ्यातून सत्य दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले, बोलले नाहीत, पत्रकार परिषदा केल्या नाहीत. ते अहंकारातून म्हणजे अहंकारी राजा… आदित्यजी एकदा डाओसला जाऊन आलो की, आभाळाला हात लागले. हाजी हाजी करणारे समोर आहेतच… त्यामुळे विलासी राजपुत्र ठरतो. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र कशा पद्धतीने चालत नाही.

— माजी मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी
माझी तर पुन्हा एकदा मागणी आहे. खरच अडीच वर्षात तुम्ही प्रयत्न करून प्रस्ताव आणले असतील, यावर तुम्ही ठाम असाल तर माझ्या या मागणीला समर्थन करा. या अडीच वर्षाच्या काळामध्ये नेमके किती प्रस्ताव आले? किती कोटींचे आले? कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते. ते प्रत्यक्षात सुरू झाले का? सुरू नाही झाले? या सगळ्याची अडीच वर्षाच्या काळातील माजी मुख्य न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी…होऊ दे दूध का दूध पानी का पानी… तुम्हाला एवढा आत्मविश्वास असेल तर आमच्या मागणीला समर्थन द्या. त्या अडीच वर्षांमध्ये आलेले प्रोजेक्ट किती? करार किती झाले? सवलतीचे करार किती झाले? जागा प्राप्त किती झाल्या?  या सगळ्याचा लेखाजोखा जनतेसमोर यावा आणि आताच्या उद्योग मंत्र्यांनी माजी मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी आणि एका महिन्याच्या आत त्याचा अहवाल द्या.

–‘चोर मचाए शोर’ हे माझं म्हणणं खरं ठरेल….
भाजप म्हणून आमचा आरोप आहे की, म्हणताय ना तुम्ही सामंजस्य करार केला होता. फॉक्सकॉनशी, वेंदातशी, एअर बसशी केलं होतं. ड्रग पार्कशी केले होते. तर सामंजस्य करार केलेले प्रकल्प सुरू का झाले नाही? सामंजस्य करार ते प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होणे; सामंजस्य करार ते जागा मिळविणे या सगळ्यांमध्ये दिरंगाई का झाली? वेळ का झाली? या सगळ्यांमध्ये झालेली दिरंगाई ही त्या उद्योग जगतातल्या उद्योजकांशी वाटाघाटी करत होतात का? टक्केवारीची भाषा चालली होती का आणि त्यामुळे याचीही चौकशी व्हावी. तत्कालीन उद्योगमंत्री आणि त्यांच्या ओएसडींच्या त्या काळातील सर्व निर्णय चर्चा आणि कारवाई याचीही संपूर्ण चौकशी व्हावी. यालाही तुम्ही समर्थन द्या. ही आमची आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, असे शेलार यावेळी म्हणाले.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

2 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

3 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

3 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

3 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

9 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

10 hours ago