महाराष्ट्र

Beed News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीयाची आत्महत्या, गोळी झाडून संपवले जीवन

भाजपच्या गोटातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भगीरथ यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारणातील बीड शहराचा तरुण चेहरा म्हणून भगीरथ बियाणी यांची ओळख होती, मात्र त्यांच्या अचानक जाण्याने दुःख व्यक्त केले जात असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अनेक वर्षांपासून एक तरुण चेहरा, सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते काम करत होते. सध्याच्या काळात ते भाजपच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळत होते.

आज सकाळी भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडून घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेबाबत कळताच कुटुंबियांनी धावाधाव करून शहरातील फिनिक्स रुग्णालय गाठले, मात्र रुग्णालयात डाॅक्टरांनी त्यांनी मृत म्हणून घोषित केले. बीडपासून सुमारे 25 किमी लांब असलेल्या एमआयडीसी परिसरातील घरामध्ये भगीरथ बियानी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या घरी एक पिस्तूल सापडले, त्यातूनच गोळी झाडल्याचे निष्पन्न झाल्याचे बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

Infosys Shares : इन्फोसिस करतेय शेअर्स बायबॅकचा विचार! कंपनीच्या शेअर्समधील घसरण सुरूच

Amit Thackeray : मनसे शहराध्यक्षाचा मित्राकडून खून, अमित ठाकरे कुटुंबियांच्या भेटीला

Mumbai Police : दाऊद गँगला मुंबई पोलिसांचा दणका! एकाच वेळी टोळीतील 5 जणांना अटक

भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठा मानसिक आघात झाला आहे, त्यामुळे बियाणी यांच्या आत्महत्येबाबत कोणतीच प्रतिक्रिया सुद्धा त्यांच्याकडून आलेली नाही. पोलिसांनी सुद्धा या घटनेनंतर तपासाला वेग दिला असून त्यांनी सुद्धा याबाबत कोणतेच कारण दिलेले नाही. भगीरथ बियाणी हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती मानले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून तरुण आणि एक खंदा कार्यकर्ता म्हणून ते भाजपमध्ये काम करत होते. केवळ राजकारणच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे होते.

बियाणी यांच्या मृत्यूची वार्ता कळताच भाजप नेत्या प्रीतम मुंडे तात्काळ रुग्णालयात पोहोचल्या. पंकजा मुंडेंसोबत खासदार प्रितम मुंडे यांचे सुद्धा भगीरथ बियाणी अतिविश्वासू कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. या विश्वासामुळेच बियाणी परभणी शहराचे भाजप शहराध्यक्षपद म्हणून जबाबदारी पार पाडत होते. भगीरथ बियाणी यांच्या आकस्मित जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले, भगीरथ बियाणी हे भाजपचे निस्सिम कार्यकर्ते होते. ते शांत आणि मनमिळावू स्वभावाचे तसेच अभ्यासू नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले असे म्हणून त्यांनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

12 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

13 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

14 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

15 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

15 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

15 hours ago