28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रAmit Thackeray : मनसे शहराध्यक्षाचा मित्राकडून खून, अमित ठाकरे कुटुंबियांच्या भेटीला

Amit Thackeray : मनसे शहराध्यक्षाचा मित्राकडून खून, अमित ठाकरे कुटुंबियांच्या भेटीला

यावेळी एका वेगळ्याच कारणावरून मनसे सध्या चर्चेत आली आहे. परभणी येथे मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा त्यांच्या मित्रानेच खून केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे वृत्त कळताच मनसे नेते अमित ठाकरे यांनी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. 

राज्यात राजकीय वादंगात सगळेच पक्ष आपापल्या महत्त्वामुळे चांगलचे चर्चेत आलेले आहेत. यामध्ये मनसे या पक्षाला सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या या वादात आपली पोळी भाजून घेण्याची नामी संधीच चालून आल्यामुळे मनसे आता शिंदे, भाजपला हात मिळवणी करणार असल्याच्या वावड्या रोज उठत आहेत. परंतु मनसेकडून अद्याप तशी कोणतीच अधिकृत भूमिका समोर न आल्यामुळे सारेच समीकरण न उलगडणारे आहे. दरम्यान यावेळी एका वेगळ्याच कारणावरून मनसे सध्या चर्चेत आली आहे. परभणी येथे मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा त्यांच्या मित्रानेच खून केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे वृत्त कळताच मनसे नेते अमित ठाकरे यांनी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे परभणी दौरा केला. यावेळी त्यांनी हत्या झालेल्या मनसैनिकाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले आहे. काहीच दिवसांपूर्वी एका वादातून मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची त्यांच्या मित्रानेच हत्या केली होती. सदर वाद एका शुल्लक कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai Police : दाऊद गँगला मुंबई पोलिसांचा दणका! एकाच वेळी टोळीतील 5 जणांना अटक

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, हातात मशाल घेऊन घरे जाळू नका

Mumbai News : 28 लाखांचं सोनं, सीसीटीव्हीचा डीव्हीआर अन् पोलिसांना चकवा! मुंबईत बॉलिवूड स्टाईल चोरी

परभणी येथील शिवराम नगर येथे राहणारे मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील काही दिवसांपूर्वी त्यांच्या मित्रासोबत रात्री बसले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक बोलत असताना वाद उफाळला. वादामागचे कारण शुल्लक होते परंतु बात हमरी तुमरीवर आल्यामुळे मित्राने पाटील यांच्या मानेवर चाकूने वार केले. अचानकपणे वार झाल्याने सचिन पाटील जागीच कोसळले. पाटील यांच्या खूनामुळे परभणी शहरात मात्र एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेची दखल घेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी तात्काळ परभणी गाठून सचिन पाटील यांच्या कुटुंबियांच्या घरी भेट दिली. भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन सुद्धा केले. यावेळी बोलताना त्यांच्या पाटील यांच्या मातोश्रींचे अश्रू अनावर झाले त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मुलगा खूप कर्तबगार होता, दोन-अडीच वर्ष मोठमोठ्या लोकांचं काम बंद होतं, मात्र त्याने आम्हाला सांभाळलं, असे हात जोडून अमित ठाकरेंना सांगितलं. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले, हे खूप शॉकिंग होतं, मुलांचं भविष्य आहे, असे म्हणून सचिन यांच्या पत्नीला जॉब संदर्भात यावेळी सुचवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी