महाराष्ट्र

भास्कर जाधवांनी दमदाटी केलेल्या चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

टीम लय भारी

महाड:- चिपळूणकरांना महापूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. यानंतर आता चिपळूणमधील दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, असे ती महिला म्हणाली आहे (Bhaskar Jadhav shout on women in chiplun then woman has given her reaction)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.25) महापूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर जोरदार टीकास्त्र सुरू केले.

संजय राऊत यांची भास्कर जाधवांच्या दमदाटीवर पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

चिपळूणमधील त्या महिलेने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितले. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलले जाते हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला, अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील त्या महिलेने दिली आहे (People misunderstood said the woman from Chiplun)

शिवसेना नेते भास्कर जाधव

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमकं काय घडलं?

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याचवेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

तळीये गावातील अजूनही 32 नागरिक बेपत्ता; मृतांचा आकडा 53 वर, बचाव कार्य सुरूचं

Woman’s first reaction to Bhaskar Jadhav’s shout

महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला बाकी काय तुझा मुलगा कुठे आहे, अरे आईला समजव, आईला समजव उद्या ये, असे भास्कर जाधव तावातावाने बोलत होते (What exactly happened in the Chiplun market yesterday)

Sagar Gaikwad

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago