महाराष्ट्र

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

टीम लय भारी

मुंबई : शुक्रवारी (दि. १५ जुलै २०२२) भाजप-शिंदे सरकारने महाविकास आघाडीकडून मंजूर केलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यात जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले. परंतु याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा या सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि उस्मानाबाद शहराला ‘धाराशिव’ असे नाव देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

याबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या तिन्ही गोष्टींना महाविकास आघाडी सरकारने आधीच मान्यता दिली आहे. परंतु राज्यात सत्ता नाट्य सुरु असताना, आणि महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेल्यानंतर या नामांतराला मान्यता देण्यात आली. म्हणून हे वैध नसल्याने भाजप-शिंदे सरकारने याबाबत पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आला.

यावेळी एमएमआरडीएला विविध विकासकामासाठी बँकेकडून ६० हजार कोटी कर्ज घेण्यात येणार असल्याचा निर्णय देखील मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. या कर्जत पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेला शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

पूनम खडताळे

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

10 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

11 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

11 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago