धक्कादायक : छत्रपतींचा अपमान करणारा छिंदम पोलीस संरक्षणात करतोय प्रचार

लय भारी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अहमदनगर शहर मतदारसंघात श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात प्रचार करत आहेत. छिंदम अहमदनगर महापालिकेत भाजपाचा उपमहापौर असताना त्याने शिवरायांचा अपमान केला होता. त्यामुळे त्याची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती.

छिंदम हा त्यानंतर महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आला. आता तो  बसपातर्फे विधानसभेची निवडणूक लढवत आहे. छिंदमने त्याचे प्रतिस्पर्धी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून, त्यांच्या समर्थकांकडून आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर त्याला सशस्त्र अंगरक्षक देण्यात आला आहे. त्यामुळे छिंदम याचा पोलीस संरक्षणात प्रचार सुरु आहे.

दरम्यान, छिंदम यांच्या प्रचारासाठी शनिवारी पक्षाच्या अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची शहरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. मायावती यांची यापूर्वी सन २००४ मध्ये नगरमध्ये सभा झाली होती. आता बसपाने सभेची जोमाने तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

छिंदमच्या घराची, गाडीची झाली होती तोडफोड…

शिवरायांचा अपमान केल्यानंतर श्रीपाद छिंदमला अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरुन १६ फेब्रुवारी २०१८ च्या घटनेचा आधार घेत त्यांच्या समर्थकांनी आपल्या घराची, गाडीची तोडेफोड केल्याची छिंदम यांनी तक्रार केली होती. याच घटनेचा आधार घेत त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. जगताप यांनी आपल्याला पकडून देण्यासाठी जाहीर केलेले अकरा लाखांचे बक्षीस, उमेदवारी दाखल केल्यानंतर आपल्याला येत असलेल्या धमक्या यामुळे आपण पोलिसांकडे अंगरक्षकाची मागणी केली होती, अशी माहिती छिंदम याने प्रसारमाध्यमांना दिली.

तुषार खरात

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

2 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

2 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

2 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

2 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

2 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

3 hours ago