महाराष्ट्र

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM machines) केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल (case registered) करण्यात आला आहे. त्यांच्यावर हे प्रकरण शेकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आला आहे. या मतदारसंघात आज सकाळपासून मोठं-मोठ्या घडामोडी घडल्या.(Rupali Chakankar’s problems increased; The EVM machine was worshipped; A case was registered)

अजित पवार यांचा ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग गाजला. तर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. राजकीय वातावरण अशा प्रकारे ढवळून निघत असतानाच आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे.

खडकवासाला परिसरातील घटना

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली. आता त्यांनी ईव्हीएम मातेकडे काय मागितले असेल हे वेगळं सांगायची गरज आहे का?
निवडणूक अधिकारी चक्रावले

मतदानासाठी चाकणकर या ताट आणि दिवा कशाला घेऊन आल्या असतील असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता. मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले होते. पण चाकणकरांनी ईव्हीएमची पूजा करताच अधिकारी अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिकाऱ्यानेच याप्रकरणी तक्रार दिली. EVM मशीनची पूजा (worship of EVM machines) केल्याप्रकरणी महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मीडियावर चर्चांना ऊत

या सर्व प्रकाराची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यात अजित दादांचा डायलॉग, सुप्रिया सुळे यांचे अजित दादांच्या घरी जाणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची ईव्हीएम पूजा यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर काहींनी या प्रकारावर नाक मुरडलं आहे.

टीम लय भारी

Recent Posts

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

55 mins ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

2 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

3 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

5 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

5 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

7 hours ago