महाराष्ट्र

आवाज वाढीव डीजे तुझ्या… पुण्यात डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी

हल्ली लग्न असो वा कोणताही सण डीजे  हा आवश्यक झालेला आहे. पोस्टर बॉय या मराठी चित्रपटातील ‘आवाज वाढीव डीजे तुझ्या शप्पथ हाय’ हे गाणेही प्रसिद्ध आहे. असे असताना दहीहंडी कार्यक्रमासाठी गणेश पेठेतील पांगुळआळी येथे लायटिंग आणि डीजे सिस्टिम उभारण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा कोसळला होता. यात चार महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी आता मंडळाच्या पदाधिकार्‍यांबरोबरच चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे दहीहंडी उत्सव पुन्हा वादात सापडला आहे. राज्यात दही हंडीत हजारो गोविंद जखमी झाले असून त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. असे असताना पुण्यातल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. राहुल चव्हाण (रा. गणेश पेठ), अजय बबन सांळुखे, गोपी चंद्रकांत घोरपडे (रा. गणेश पेठ) आणि चेतन/सनी समाधान आहिरे (रा. खराडी) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणेश लालचंद चंगेडिया यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. काल साडे दहा वाजता हा प्रकार घडला होता या घटनेत मंदा लालचंद चंगेडिया (67), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय 69), केवलचंद मांगिलाल सोळंकी (वय 66) आणि ताराबाई केवलचंद सोळंकी (64) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दहीहंडी उत्सवासाठी पुण्यात मागील दोन दिवस जोरदार तयारी सुरु होती. त्यासाठी प्रत्येक चौकात लाईट आणि डीजे सिस्टिम उभारण्यात येत होती. त्यासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळीl लोखंडी पाईपचा सांगाडा उभारण्याचे काम सुरु होते. सादडी सदन येथे काही महिला आल्या होत्या. सांगाडा उभारण्याचे काम सुरु असताना त्याच्या एका खांबाला दुचाकीचा जोरात धक्का लागला. त्यामुळे हा संपूर्ण सांगाडा खाली कोसळला.

त्यातील पाईपला लागून चार ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या. सुरक्षित साधनाचा न करता सिस्टिम उभारण्यात आली असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सगळं झाल्यावर आज या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे सुद्धा वाचा
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचं एकमेकांना आव्हान!
गृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार शिल्पा शेट्टी; ‘सुखी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!
एकनाथ शिंदे आयोजित दहिहंडी उत्सवाला प्रियकरासोबत आली रकुल प्रीत 


याच प्रकारचे लहान मोठे अपघात पुणे शहरात दहीहंडीच्या निमित्ताने झाल्याचं पाहायला मिळालं. बाणेर, बालेवाडी, हिंजवडीसारख्या परिसरातदेखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. काही ठिकाणी राडेदेखील झाले तर काही ठिकाणी सामाजिक सलोखा राखल्याचं दिसून आलं. शिवाय तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं वेगळं गोविंदा पथक स्थापन करण्यात आलं होतं. त्यांनीदेखील मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. मात्र या सगळ्यात काही ठिकाणी उत्सावाचा जल्लोष दिसला तर काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागलं.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

27 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago