महाराष्ट्र

Maharashtra Corona, omicron : कोरोनाचा आकडा 26 हजारांच्या पार, तर ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण

 

टीम लय भारी

मुंबई: राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाचा (Corona Patient) विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे.  गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत(corona crosses 26,000, omikron is 144 patients)

 तर राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 8 करोना बाधित रुग्णाांच्या मत्युंंची  नोंद झाली आहे. कोरोनाची ही स्फोटक वाढ धडकी भरवणारी आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

Omicron: चिंतेतभर; देशात पुन्हा एकदा लॉकडाउन?

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

ओमिक्रॉनचाही कहर सुरूच

दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनचे टेंन्शन वाढले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत 100 रुग्णांची नोंद झाल्याने मुंबई पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. दिवसभरात नागपूरमध्ये 11 तर ठाणे आणि पुणे मनपा प्रत्येकी 7 ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 797 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने

मुंबईत आज तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तिन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मुंबईत आज 15 हजार 166 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13 हजार 195 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर आज 1 हजार 218 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात 714 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.

मुंबई लोकल प्रवासावर सरसकट निर्बंध नाही…

Global Omicron tally crosses one lakh, hospitalisation remains low

मुंबईसह उपनगरांचा धोका वाढला

ठाणे जिल्ह्यात 4721कोरोना रुग्ण दिवसभरात आढळून आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात झालेली रुग्णवाढही मोठी आहे. कामधंद्यासाठी उपनगरातून मुंबईत येणाऱ्यांची सख्या मोठी असते, त्यामुळे उपनगरातील कोरोनाचा विळखाही वाढला आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

1 hour ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

3 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

3 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

4 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

5 hours ago