महाराष्ट्र

नाशिक-पुणे महामार्गावरील धोकादायक झाडे हटवली

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांना अडथळा ठरणारी 24 झाडे हटवण्यात येत आहे. Nashik नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने या मार्गावरील पंधरा झाडे तोडली असून उर्वरीत नउ झाडांचे पुर्नरोपण केले जाणार आहे. दरम्यान रस्त्यामधील धोकादायक झाडे हटवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्य वाहतुकीच्या मार्गात ही झाडे येत असल्याने वारंवार अपघात होउन जीवित हानीच्या घटना घडत होत्या.नाशिकरोड-व्दारका मार्गावरील प्राचीन वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाले आहे. तथापी, झाडे तोडले तरी रस्ता रुंद होणार नसून फक्त त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण होणार आहे. दत्त मंदिर, उपनगर नाका, गांधीनगर येथे वाहतुकीला या झाडांमुळे अडथळे येत होते.

वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तोडण्यात येणा-या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लाऊन तीचे संवर्धन केले जाणार आहे. दरम्यान व्दारका ते नाशिकरोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे मजबूतीकरण होणार आहे. यास अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी 15 मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च 19.42 कोटी खर्च येणार आहे. यामध्ये रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण, गतीरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे. या मार्गावरील 24 झांडापैकी 15 तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या मार्गावरुन नाशिकरोडच्या नागरिकांना थेट नाशिकला जाता येते. तर देवळालीगाव, जयभवानी रोड, उपनगर, गांधीनगर, विजय ममता चौक, जेलरोड-टाकळी, टाकळी-काठेगल्ली मार्गे नाशिकला जाता येते. हे सर्व उपरस्ते नाशिकरोडला कोठे ना कोठे मिळतात. नाशिक रोड व उपनगरातील हजारो नागरीक, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक याच मार्गाने जातात त्यामुळे सकाळी व सायंकाळी हा महामार्ग जॅम होतो. त्यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर करणे काळाची गरज झाली आहे. नाशिकरोड ते व्दारका दरम्यान झाडे असल्याने अपघात होउन यात अनेकांचे बळी गेले आहेत. रस्ता मजबूतीकरणाची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता पाऊले टाकत त्यांनी जुनी कडुनिंब, वड, चिंच अशी झाडे तोडली आहे.

गंगापूर रोड, पेठ रस्त्यावरील झाडांचे काय ?

एकीकडे उद्यान विभागाने नाशिक-पुणे महामार्गावरील धोकादायक झाडे तोडण्यात आली. मात्र जशी कारवाई उद्यान विभागाने या मार्गावर केली. त्याच प्रमाणे गंगापूर रोड व पेठ रस्त्यावरील धोकादायक झाडे हटवायला उद्यानला मुहूर्त मिळ्णार कधी ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकाणास जुनी परवानी देण्यात आली होती, त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाला नियमानुसार झाडे हटवण्यास परवानी देण्यात आली होती. झाडे तोडताना थेट रस्त्यामधेल तोडली जात आहे. तसेच हे काम महापालिकेचे नव्हेतर राष्ट्रीय महामार्गाकडून केले जात आहे.
-विवेक भदाणे, अधिक्षक, उद्यान विभाग, मनपा

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

5 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago