नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांना अडथळा ठरणारी 24 झाडे हटवण्यात येत आहे. Nashik< Nashik-Pune highway>
वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तोडण्यात येणा-या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लाऊन तीचे संवर्धन केले जाणार आहे. दरम्यान व्दारका ते नाशिकरोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे मजबूतीकरण होणार आहे. यास अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी 15 मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च 19.42 कोटी खर्च येणार आहे. यामध्ये रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण, गतीरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे. या मार्गावरील 24 झांडापैकी 15 तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या मार्गावरुन नाशिकरोडच्या नागरिकांना थेट नाशिकला जाता येते. तर देवळालीगाव, जयभवानी रोड, उपनगर, गांधीनगर, विजय ममता चौक, जेलरोड-टाकळी, टाकळी-काठेगल्ली मार्गे नाशिकला जाता येते. हे सर्व उपरस्ते नाशिकरोडला कोठे ना कोठे मिळतात. नाशिक रोड व उपनगरातील हजारो नागरीक, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक याच मार्गाने जातात त्यामुळे सकाळी व सायंकाळी हा महामार्ग जॅम होतो. त्यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर करणे काळाची गरज झाली आहे. नाशिकरोड ते व्दारका दरम्यान झाडे असल्याने अपघात होउन यात अनेकांचे बळी गेले आहेत. रस्ता मजबूतीकरणाची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता पाऊले टाकत त्यांनी जुनी कडुनिंब, वड, चिंच अशी झाडे तोडली आहे.
गंगापूर रोड, पेठ रस्त्यावरील झाडांचे काय ?
एकीकडे उद्यान विभागाने नाशिक-पुणे महामार्गावरील धोकादायक झाडे तोडण्यात आली. मात्र जशी कारवाई उद्यान विभागाने या मार्गावर केली. त्याच प्रमाणे गंगापूर रोड व पेठ रस्त्यावरील धोकादायक झाडे हटवायला उद्यानला मुहूर्त मिळ्णार कधी ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकाणास जुनी परवानी देण्यात आली होती, त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाला नियमानुसार झाडे हटवण्यास परवानी देण्यात आली होती. झाडे तोडताना थेट रस्त्यामधेल तोडली जात आहे. तसेच हे काम महापालिकेचे नव्हेतर राष्ट्रीय महामार्गाकडून केले जात आहे.
-विवेक भदाणे, अधिक्षक, उद्यान विभाग, मनपा