महाराष्ट्र

कै. गणपतराव देशमुख यांना ‘पद्म’ सन्मान देण्याची मागणी !

टीम लय भारी
मुंबई : कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी शेतकरी वर्गासाठी आणि खासकरून शेती करणाऱ्यांसाठी त्यांच्या कारकिर्दीत बरंच काम केलं. (Ganpatrao deshmukh should be awarded by padm puraskar)

30 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला तसेच 10 ऑगस्टला त्यांची जयंती आहे. या सुदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी गणपतराव देशमुख यांना पद्म पुरस्कार देण्याविषयी मागणी केली आहे. (Ganpatrao deshmukh born on August 10)

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

गणपतराव देशमुख

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच

या पुरस्कारासंदर्भात त्यांनी राज्यशासनाकडून केंद्र सरकारला विनंती करावी अशी मागणी केली आहे. त्याचसाठी त्यांनी पाठपुरावा सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे. विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूर येथील पालकमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच सचिव या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर व्हावा म्हणून निवेदने दिलेली आहेत.

राजकीय मानमरातब मिळवण्यापेक्षा त्यांनी लोकसेवेचे व्रत उचलले होते. शेतकरी आणि पीडित लोकांसाठी त्यांनी कष्ट उपसले. खऱ्या अर्थाने ते जनतेचे नेते होते, त्यांनी 51 वर्षे सांगोल्यात राज्य केले. पक्षाशी आणि इमानाशी ते प्रामाणिक राहिले. महाराष्ट्रातून आतापर्यंत सर्वात जास्त वेळा, 11 वेळा विधानसभेत निवडून येण्याची धमक त्यांच्याशिवाय अजून तरी कोणत्या नेत्यात दिसून येत नाही.

त्यांच्या पाणी चळवळीमुळे आणि लोकसेवेमुळे त्यांना समाजाचे प्रेम लाभले. आमदार, विरोधी पक्षनेते तसेच कॅबिनेट मंत्रिपदाची धूरा ही त्यांनी सांभाळली. राजकारण करावे तर असे नेते जन्मले पाहिजेत अशी हळहळ प्रत्येक संगोलेकराच्या मनातून व्यक्त होते. त्यांची (Ganpatrao deshmukh) नेहमीच उणीव भासेल आणि त्यांची ही उणीव व त्यामुळे समाजाला राजकारणाची जाणीव नेहमी होत राहावी म्हणून त्यांना मृत्यूपश्चात पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी इच्छा विक्रम ढोणे यांनी व्यक्त केली.

मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

NCP chief Sharad Pawar meets kin of PWP veteran late Ganpatrao Deshmukh

त्यांच्या जयंतीचा दिवस, 10 ऑगस्ट हा श्रमिक दिन म्हणून ओळखला जातो, त्यांच्या देशनिष्ठ कार्याला स्मरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा सन्मान जाहीर करावयास हवा होता असेही ढोणे पुढे म्हणाले.

 

Mruga Vartak

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

6 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

9 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

10 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago