महाराष्ट्र

BHR Scam : बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन लाभार्थी

माजी नगराध्यक्षांचा आरोप

 

टीम लय भारी

 

जळगाव : राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात (BHR Scam) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

 

यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गट नंबर घेऊन जनतेने आॅनलाइन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.

 

बीएचआर पतसंस्था डबघाईस येऊन अवसायनात गेली. त्यावेळी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी अवसायक म्हणून आपल्या मर्जीतील जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करवून घेतली. पाच वर्षे त्यांची बदली होऊ दिली नाही. अवसायक कंडारे यांच्या माध्यमातून लिलावाचा देखावा करून सुनील झंवर यांच्यासह काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या नावे कवडीमोल दराने मालमत्ता घेतल्या.

 

त्यातही मालमत्तांच्या लिलावातून आलेली रक्कम ठेवीदारांना परत करणे अपेक्षित होते. मात्र रक्कम न भरता बहुतांशी ठेवीदारांच्या पावत्या कमिशनवर घेऊन त्यांचा भरणा केला. अशा प्रकारे ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप ललवाणी यांनी केला आहे.

 

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

14 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

15 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

15 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago