महाराष्ट्र

राज्यातील पहिला सरकारी घोटाळा बाहेर काढणाऱ्या संपादकांचे निधन

टीम लय भारी

धुळे : राज्यातील पहिला घोटाळा खणून काढण्याची कामगिरी बजावणारे दैनिक मतदार चे संस्थापक संपादक जगतराव सोनवणे यांचे अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे ( Jagatrao Sonavane passed away due to minor disease)

जिल्हा परिषदेतील नोकरी सोडून जगतराव सोनवणे यांनी ‘मतदार’ हे सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि वंचित समाजासाठी वाहिलेले वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी आणि कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी कर्मचारी आणि अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्याय संस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.

राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील 4 युवक सन्मानित

‘आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये’

राज्यातील पहिला सरकारी घोटाळा बाहेर काढणार्या संपादकांचे निधन

गेले काही दिवस देशातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन चिरडण्याच्या सरकारी प्रयत्नांनी सोनवणे अस्वस्थ होते. प्रकृती साथ देत नसतानाही ते कापडणे येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पुरोगामी विचारांची बैठक पक्की असलेल्या सोनवणे (Jagatrao Sonavane) यांनी आयुष्यभर व्रतस्थ पत्रकारिता केली. सेवा शर्ती, तसेच कायदेशीर बाबींबाबत ते शेवटपर्यंत सर्वसामान्यांना मोफत मार्गदर्शन करत होते.

‘लय भारी’चे विषय सामान्यांना आपले वाटतात : धनंजय मुंडे

Journalist Jagatrao Sonawane dies

धुळे जिल्ह्यातील काटवन परिसर विकासासह अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.
सोनवणे यांनी धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढला होता. त्यासाठी त्यांना पा. वा. गाडगीळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शक, सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहिणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक अशी सोनवणे यांची ओळख होती.

 

Mruga Vartak

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago