30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील 4 युवक सन्मानित

राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील 4 युवक सन्मानित

टीम लय भारी

दिल्ली : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारवार महाराष्ट्रातील चार युवकांनी आपले नाव कोरले आहे (Four youths from Maharashtra have been nominated for the National Youth Award).

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्याने साधून दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व्यक्तिगत व संस्थात्मक श्रेणींमध्ये वर्ष 2017-2018 आणि वर्ष 2018-2019 च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (Was honored with the National Youth Award).

‘लय भारी’ कार्यालय उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे

‘लय भारी’चे विषय सामान्यांना आपले वाटतात : धनंजय मुंडे

पुणे येथील सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी, जळगाव येथील रणजितसिंह राजपूत यांना वर्ष 2017-2018 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कार तर नागपूर येथील सिध्दार्थ रॉय यांना वर्ष 2018-2019 च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘लय भारी’चे धाडस तरूणांसाठी प्रेरणादायी : बाळासाहेब थोरात

Anurag Singh Thakur gives national youth awards, says they are drivers of new ideas

Maharashtra have been nominated for the National Youth Award
अनुराग ठाकूर

यावेळी मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वयक डियर्ड बॉयडंड उपस्थित होत्या. या कार्यक्रमात वर्ष 2017-2018 साठी 14 तसेच वर्ष 2018-2019 साठी 8 अशा एकूण 22 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. व्यक्तिगत पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र तर संस्थात्मक पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी