महाराष्ट्र

‘टोपी घातल्याने कुणी गांधी होत नाही!’ जितेंद्र आव्हाड यांची अण्णा हजारेंवर बोचरी टीका

केंद्रात मनमोहन सिंग यांचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना या सरकार विरोधात देशभरातील काँग्रेस विरोधक गोळा करत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे केंद्रात २०१४ रोजी भाजपा सरकार आले. नऊ वर्षात देशात विविध बदल झाले. मोदी सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेस खासदार राहुल गांधी आरोप करत आहेत.राज्यातील सरकार विरोधात आरोपाच्या फैरी विरोधक झाडत आहेत. असे असताना अण्णा हजारे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. त्यामुळेच की काय, राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी,’ या माणसाने ह्या देशाचे वाटोळे केले टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’ असे हजारे यांचा फोटो टाकून ट्विट केले आहे.

२०१४ पूर्वी सलग दोन वेळा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. याच काळात कोळसा खाणी वाटप घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अनेक मंत्री तुरुंगात गेले. दिल्लीत एका लहान मुलीवर अत्याचार झाला. नंतर तिचे नामकरण निर्भया असे करण्यात आले. २०१२ पासून देशाचे नेतृत्व करण्यासाठी एकीकडे संघ मोदी यांना प्रशिक्षण देत होते. दुसरीकडे भाजपाच्या माध्यमातून बाबा रामदेव, आयपीएस अधिकारी किरण बेदी, अरविंद केजरीवाल, कायदे तज्ज्ञ प्रशांत भूषण आदी काँग्रेस विरोधात उभे ठाकले.

देशभरात काँग्रेस विरोधात वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. दरम्यानच्या काळात दिल्ली विधानसभा अरविंद केजरीवाल जिंकले. भाजपचे केंद्रात सरकार आल्यावर किरण बेदी यांना राज्यपाल करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या व्यवसायाला भरभराट आली.

मध्यंतरी मोदींच्या प्रसिद्धीच्या वाढत्या कमानीमुळे विविध राज्यासह केंद्रात भाजपा सरकार आले. दुसऱ्यांदा सत्तेत सहभागी झालेल्या मोदी सरकारला ३०० हून अधिक जागा मिळाल्या. देशात मोदी यांचा एकछत्री कारभार सुरू झाला. राज्यात दुसऱ्यांदा भाजपचे सरकार आले. केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. गौतम अदानी मोदी यांच्या कार्यकाळात देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कसे झाले. त्यांच्या कंपनीमध्ये कोणाची गुंतवणूक आहे, असे एक ना अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले.राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकार विरोधात विरोधकांनी रान उठवले आहे.

हे ही वाचा 

महाराष्ट्र की ‘महा’दुर्घटनाग्रस्त राज्य? 6 महिन्यांत 6 मोठ्या दुर्घटना

अजितदादांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविसांचा वाजविला ‘बँड’ !

राष्ट्रवादीच्या कार्यालयात सामान्य जनतेला ‘शाही’ वागणूक!

ईशान्यकडील मणिपूर तीन महिने जळत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मणिपूरमध्ये तणाव कायम आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.असे सगळे काही असताना अण्णा हजारे मूग गिळून बसलेत. अण्णा हजारे यांचे हे झोपेचे सोंग भाजपच्या पचनी पडणारे आहे. नऊ वर्षांपूर्वी केंद्रातील काँग्रेस सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या अण्णा हजारे यांना देशात भाजपाच्या कार्यकाळात रामराज्य आले आहे असे वाटते का, असा सवाल विरोधक करू लागले आहेत. अनेक जण अण्णा हजारे हे ढोंगी असल्याचे प्रतिपादन करतात.

अण्णा हजारे हे महात्मा गांधी यांना मानतात. शुभ्र धोतर, सदरा आणि त्यावर गांधी टोपी असा त्यांचा पेहराव आहे. उक्तीतून गांधीवादी असल्याचे सांगणारे हजारे हे संघाचा अजेंडा राबवित असल्याचा आरोप होत असतो. आता तर आमदार आव्हाड यांनी,’ टोपी घातल्याने कुणी गांधी होत नाही! ‘ अशा शब्दात अण्णा हजारेंवर जोरदार टीका केलीय.

विवेक कांबळे

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago