खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नवी मुंबईत जड, अवजड वाहनांना रविवारी प्रवेश बंद करण्यात आला आहे. 16 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनांच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शनिवार, 15 एप्रिलपासूनच नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनांच्या येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे काकडे यांनी सांगितले.
16 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंतच्या नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमूद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील जड-अवजड वाहनांना बंदी लागू असणार नाही.
नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडरपासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील.
दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दिनांक 17 एप्रिल 2023च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमूद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेशबंदी असणार आहे.
पुणे-मुंबईकडून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जाऊन कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जाऊन पुढे इच्छित स्थळी जातील.
ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही.
जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…
जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…
आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…