31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणजड, अवजड वाहनांना रविवारी नवी मुंबईत प्रवेश बंद

जड, अवजड वाहनांना रविवारी नवी मुंबईत प्रवेश बंद

खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नवी मुंबईत जड, अवजड वाहनांना रविवारी प्रवेश बंद करण्यात आला आहे. 16 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनांच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नवी मुंबईत जड, अवजड वाहनांना रविवारी प्रवेश बंद करण्यात आला आहे. 16 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनांच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

शनिवार, 15 एप्रिलपासूनच नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनांच्या येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे काकडे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील वाहतुकीतील बदल 

16 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंतच्या नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमूद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

  1. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडून ठाणे बेलापूर रोडने तसेच शिळफाटयाकडून महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनाना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
  2. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रूतगती मार्गाने ऐरोली टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
  3. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनाना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
  4. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रूतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
  5. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडून गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
  6. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड-अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील जड-अवजड वाहनांना बंदी लागू असणार नाही.

नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडरपासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे 
  • प्रवेश बंद 

दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दिनांक 17 एप्रिल 2023च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमूद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेशबंदी असणार आहे.

  • पर्यायी मार्ग

पुणे-मुंबईकडून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जाऊन कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जाऊन पुढे इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही.

heavy vehicles not allowed, heavy vehicles not allowed in Navi Mumbai, Maharashtra Bhushan, Entry of heavy vehicles to Navi Mumbai closed on Sunday, Kopra Bridge

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी