Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(“Lay Bhari” has been aggressively covering the scandals and bullying of MLA Jayakumar Gore for a week) आपण माण – खटावचा विकास केलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, असं जयकुमार गोरे सतत बोलत असतात. त्या अनुषंगाने लय भारीचे संपादक तुषार खरात वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहेत. तेथील जनतेसोबत संवाद साधत आहेत. जयकुमार गोरे यांनी खरंच विकास केला आहे, का याबाबत सामान्य लोकांशी संवाद साधत आहे. मायणी येथील बाजारात जावून तुषार खरात यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

Shahajibapu Patil | Jaykumar Gore | जयकुमार गोरेंचे नाव घेताच शहाजीबापू पाटलांचे समर्थक खवळले

एका महिला शेतकऱ्यांशी बोलत असताना त्यांनी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच बोलत नाही, असं सांगितलं. आम्हाला १५०० रूपयांची गरज नाही. आम्हाला आमच्या शेतमालाला हक्काचा भाव द्या, असं या शेतकरी महिलनं सांगितलं. आमचं गाव एनकूळ आहे. एनकूळमध्ये कॅनॉल आलेला नाही. त्यामुळं उन्हाळ्यात पाणी नसतं. माझी मुलं आमदार जयकुमार गोरे यांचेच कार्यकर्ते आहेत. जयकुमार गोरे गावात येतात. गावटग्यांना भेटतात.

आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात

मोठमोठ्या माणसांना भेटतात. पण गरीब शेतकऱ्यांना कोणी भेटत नाही, अशी भावना या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण – खटाव मतदारसंघात गुंड पोसले आहेत. विरोधक, पत्रकार, साहित्यिक, अधिकारी वर्ग, सरकारी यंत्रणा यांना धाकात ठेवण्यासाठी जयकुमार गोरे हे सतत आपल्या गुंडांना उत्तेजन देत असतात. गेल्या आठवडाभरापासून आमदार जयकुमार गोरे यांच्या घोटाळ्यांची, दादागिरीची चिरफाड करणारी बातमीदारी ‘लय भारी’ने आक्रमकपणे केलेली आहे. यात जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत. जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला. जयकुमार गोरे यांच्या विकासाचा बुरखा फाडणाऱ्या या प्रतिक्रिया ‘लय भारी’ लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांची संभावना ‘जनावरांवर भुंकणारा कुत्रा’ अशी केली आहे. ही उपाधी सार्थ ठरविण्याचा चंग जयकुमार गोरे बांधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार एखादं कुणी चांगलं काम करीत असेल तर त्याला ते काम करू द्यायचं नाही, त्या व्यक्तीवर कुत्र्यासारखं भुंकायचं, अशी कार्यपद्धतीत जयकुमार गोरे यांची आहे. हे भुंकण्याचं काम जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. जयकुमार गोरे यांच्या या गुंडगिरीला भीक न घालता ‘लय भारी’ने बाजारात सामान्य लोकं व महिलांच्या प्रतिक्रीया घेतल्या.

तुषार खरात

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

19 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

21 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

22 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago