महाराष्ट्र

रोहित पवारांचा पुढाकार, गटसचिवांचे प्रश्न मांडले मंत्रालयात !

टीम लय भारी

जामखेड : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गटसचिवांच्या प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून  मुंबई येथे बैठक पार पडली. राज्यातील गटसचिवांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे(MLA Rohit Pawar took initiative on the meeting held at mumbai).

या बैठकीला सहकारमंत्र्यांसह राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सहकार आयुक्त, आ. रोहित पवार यांच्यासह इतरही काही आमदार तसेच ‘महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समिती’चे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात ज्या सेवा सोसायट्यांचा महत्त्वाचा वाटा असतो त्यांचा प्रशासकीय कारभार गटसचिव बघतात. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेची यशस्वी अमलबजावणी करण्याम

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गटसचिवांच्या प्रश्नांबाबत आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातून  मुंबई येथे बैठक पार पडली

या गट सचिवांचे मोठे योगदान आहे.

राणेंचा भंपकपणा, ‘मोदी एक्स्प्रेस’च्या नावाने गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

एकनाथ खडसेंनी १२ आमदारांच्या नियुक्तीवरून सुधीर मुनगुंटीवारांना केले ‘लक्ष्य’

कोविडच्या संसर्गातही शेतकऱ्यांना सेवा देण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे सुरूच होते. मात्र त्यांचे सेवा आणि वेतनविषयक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तर त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते तर काही जिल्ह्यांमध्ये अगदी १५-२० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

राज्यातील सुमारे २१ हजार विकास सोसायट्यांच्या गटसचिवांचा हा प्रश्न आहे. गटसचिवांना लोकसेवकाचा दर्जा देण्यात यावा, ग्रामसेवकासमान वेतनश्रेणी लागू करावी, समान काम-समान वेतन, सेवा नियम लागू करणे अशा अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या सर्व विषयांवर काल झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गटसचिवांच्या प्रश्नांबाबत आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातून  मुंबई येथे बैठक पार पडली

नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती घडवा!

Nitish Kumar’s MLA Explains Why He Was Seen In His Underwear On Train

याच विषयावर येत्या दोन आठवड्यात आणखी एक बैठक घेण्याचे निश्चित झाले असून या बैठकीत गटसचिवांच्या मागण्यांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले. आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे ही बैठक झाल्याने महाराष्ट्र सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Mruga Vartak

Recent Posts

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

33 mins ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

56 mins ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

2 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

3 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

4 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

5 hours ago