टीम लय भारी
मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले. आज थेट मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केली आहे. आमच्या या कृतीमुळे शिवसेनेचे हिंदुत्व जागं होईल, असं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.(Mns bhonga at shiv sena bhavan)
या सगळ्या प्रकरणावर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे म्हणतात की, शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे मात्र आमच्यावर अशा प्रकारे कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे.
हे सुध्दा वाचा:
Ajit Pawar vs Raj Thackeray On Loudspeakers With ‘Hanuman Chalisa’ At Mosques
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…
गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…
दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…
या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…
फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…