महाराष्ट्र

निलेश साबळे यांच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोचा प्रोमो रिलिज

“हसताय ना ? हसायलाच पाहिजे” असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) हा त्याचा नवीन शो ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ हा शो घेऊन आला आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलिज झाला असून मागील काही दिवसांपासून या नवीन शोचे बरेच प्रोमो, व्हिडिओ आणि चर्चा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तेव्हा पासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे.(Nilesh Sable’s ‘Are you laughing? Must laugh!’ promo of the show released)

या नवीन प्रोमोत ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. या सोबत अभिनेते भरत जाधव व अलका कुबल या देखील ओंकार व भाऊ यांच्या विनोदावर हसत आहेत. या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांचे पात्र साकारत आपल्याला दिसतील. त्या दोघांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडल्याचे दिसते. त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स व कमेंट्सचा चांगलाच वर्षाव होतोय.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केले. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा देखील समावेश आहे. या शोचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता. येणाऱ्या २७ तारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

3 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

5 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

8 hours ago