उत्तर महाराष्ट्र

वीजप्रश्नी सेनेचा आदोंलनाचा इशारा

चार दिवसापासून नाशिक रोड, शहर, ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा ( power issue) खंडीत होत असल्याने नागरिक व व्यावसायिकांचे हाल होत आहेत. शेतक-यांचे नुकसान होत आहे. महावितरणने वीज पुरवठा ( power issue) तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता डोंगरे यांना निवेदन दिले. वीज पुरवठा ( power issue) लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.(Army threatens to protest over power issue)

निवेदनाचा आशय असा – एकलहरे येथे ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तो दिवसात दोन-दोन तास सुरु ठेवण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते. त्याचे नियोजन योग्य पध्दतीने केले जात नाही. त्यामुळे नागरीकांचे मोठे हाल होत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे कठीण होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर केल्यास पिकांना वेळेवर पाणी देता येईल.

यावेळी माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक भारती ताजनपुरे, कन्नू ताजणे, उत्तम कोठुळे, किरण डहाळे, अंबादास ताजनपुरे, सागर भोर, रमेश पांळदे, प्रशांत दिवे, योगेश देशमुख, अशोक जाधव, योगेश गाडेकर, सागर निकाळे, मिलिंद मोरे,शिवा गाडे, राजू मोरे, विजय भालेराव, अनिल गायखे, मंगेश पोरजे, कुलदीप जाधव, अंबादास ताजनपुरे, किशोर कानडे, संजय गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

2 hours ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

2 hours ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

3 hours ago

लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं. पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं…

7 hours ago

सुजय विखेंचा रडीचा डाव !

डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. पण पराभव स्विकारण्याची…

1 day ago

महात्मा गांधी मु्स्लिमधार्जिणे होते का ? ( ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा लेख)

महात्मा गांधींजींशी संबंधित प्रसंग १ - हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले…

1 day ago