उत्तर महाराष्ट्र

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी, इंटरनेटचे काम असेा अथवा जलवाहिन्या टाकण्याचे काम यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पावसाळ्यात अपघात होऊ नयेत, यासाठी १५ मेपर्यंत खोदकामाची (digging) डेडलाइन देण्यात आली असून त्यामुळे आता वेगाने खोदकामे (digging) सुरू असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.मात्र आता यातील किती कामे १५ मे पर्यंत पूर्ण होतात आणि ती झाली नाहीत तर मनपा काय कारवाई करणार याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागून आहे.(BMC’s May 15 ultimatum for digging in the city )

त्र्यंबक नाका ते शरणपूर रोडदरम्यान होणाऱ्या मॉडेल रोडसाठी एका बाजूने सुरू झालेल्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असताना दुसरीकडे कुठे सिग्नलसाठी, तर कुठे स्पीडब्रेकरसाठी खोदकाम सुरू करण्यात आल्याने शहरवासीयांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. खड्डे चुकविताना अनेक ठिकाणी किरकोळ अपघात होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले असून ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे मंदावली आहेत, ती तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी बसविण्यात आलेले सिग्नल हे स्मार्ट सिटीच्या वतीने ऑप्टिकल केबलद्वारे जोडण्याची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. या कामासाठी शहरातील विविध ठिकाणी सिग्नलची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सिग्नलजवळच खड्डे खणून ठेवले आहे. ते लवकर बुजविले जात नसल्याने किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

सकाळ व सायंकाळच्या सुमारास रहदारी सुरू असताना खोदकाम केले जात असल्याने वाहतूककोंडीही वाढत आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याची गरज आहे, अशी वाहनधारकांची भावना आहे. त्यामुळे हे काम सुलभ पद्धतीने केल्यास नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या खोदकामांमुळे रस्ते उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. यामुळे वाहतूककोंडी होत असून खोदकामाच्या उडणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे.

या ठिकाणच्या सिग्नल परिसरात खोदकाम
गडकरी चौक, सिटी सेंटर मॉल परिसर, शरणपूर, गंगापूर नाका परिसरातील सिग्नलजवळच खोदकाम करून ठेवल्याने रहदारीस अडथळा येत आहे. या परिसरातून जातांना नागरिकांना तसेच वाहनधारकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

पंचवटीत ८९ ठिकाणी काम
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांवर थर्मोप्लॅस्टिक पेंटचे पट्टे मारण्यास प्रारंभ केल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. जे ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वंजारी यांनी दिला आहे. शहरात सुमारे ३३३ ठिकाणी मनपाने गतिरोधकांची कामे सुरू केली आहेत. त्यात सर्वाधिक पंचवटीत ८९ ठिकाणी काम सुरू आहे. त्यानंतर पूर्व ६८, सिडको ६०, नाशिकरोड ४८, पश्चिम ३२, तर सातपूरला ३२ ठिकाणी ही कामे सुरू आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

47 mins ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

1 hour ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

2 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

3 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

4 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

4 hours ago