उत्तर महाराष्ट्र

नरेंद्र मोदींच्या सभेआधी कांदा खरेदी ठरणार दिवास्वप्नच

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सभेत देवळा तालुक्यात कांदाफेक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदाही नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा (onions) उत्पादक शेतकरी असल्याने त्याचा फटका दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना जाणवत आहे. त्यासाठी निर्यातबंदी काही दिवसापूर्वी उठवली असली तरी नाफेडकडून कांदा (onions) खरेदी करून शेतकऱ्याना जो दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . तसेच नरेंद्र मोदी  यांची पिंपळगाव बसवत येथे जाहीर सभा होणार असून त्यापूर्वी नाफेडची कांदा (onions) खरेदी मात्र दिवास्वप्नच ठरणार असल्याचे वास्तव आहे.(Buying onions ahead of Narendra Modi’s rally will be a daydream)

काही दिवसापूर्वी कांदा (onions) निर्यातबंदी उठवण्यात आली . मात्र गेल्या दोन महिन्यांत कांदा खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मोठा तोटा उत्पदकांना सहन करावा लागला. जर लवकर खरेदी सुरू केली असती तर फटका बसला नसता असा आरोप कांदा उत्पादकांनी केला आहे. यावर ‘‘केंद्रीय मंत्र्यांना सांगून पुढील वर्षी वेळेवर खरेदी केंद्र सुरू करू’’ असा विश्‍वास नाफेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता मात्र ‘‘इतके दिवस खरेदी बंद होती. आता नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची प्रचार सभा होणार आहे. त्यामुळेही खरेदी सुरू केली का?’’ असा थेट सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कांदा  खरेदीचा फायदा नाही
नाफेडच्या कांदा खरेदीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नसल्याची शेतकरीवर्गात चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा आरोप शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सत्ताधारी नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र हि सर्व राजकीय जुमलेबाजी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख टन कांद्याचा बफर साठा करण्यासाठी कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती ‘एनसीसीएफ’चे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिपळगाव बसवंत येथे दिली होती. नाफेडसह ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात वाढ करून ते ५ लाख मेट्रिक टन करण्यात आले आहे. नाफेडमार्फत अडीच लाख मेट्रिक टन, तर ‘एनसीसीएफ’मार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यातील ५० विविध केंद्रांद्वारे केली जाणार आहे. डिजिटल पद्धतीने पेमेंटची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ९५ टक्के कांद्याची खरेदी होणार आहे, तर उर्वरित ५ टक्के गुजरातमधून कांद्याची खरेदी होणार असल्याची माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

4 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

5 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

6 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

10 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

10 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

12 hours ago